Akasa Air Update: ऑगस्ट २०२२ मध्ये ऑपरेशन सुरू करणारी देशातील नवीन एअरलाइन आकासा एअरने १५० Boeing 737 Max विमाने खरेदी करण्याची ऑर्डर दिली आहे. भारताच्या नागरी उड्डयन इतिहासात Akasa Air ही पहिली भारतीय विमान कंपनी बनली आहे, जिने ऑपरेशन सुरू केल्याच्या अवघ्या १७ महिन्यांत २०० पेक्षा जास्त विमानांची ऑर्डर दिली आहे, असाही Akasa ने दावा केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आकासा एअरही आंतरराष्ट्रीय मार्गांवर उड्डाण करण्याचा विचार करीत आहे. कोणत्याही विमान कंपनीसाठी आंतरराष्ट्रीय उड्डाणे करण्यासाठी २० विमाने असणे अत्यंत आवश्यक असते. आकासा एअरचे संस्थापक आणि सीईओ विनय दुबे म्हणाले, आकासा एअरच्या आर्थिक स्थिरता आणि वाढीच्या शक्यतांबद्दल आम्हाला पूर्ण विश्वास आहे. आकासा आणि तिच्या कर्मचार्‍यांनी विश्वास आणि सेवा तसेच जागतिक विमान वाहतूक क्षेत्रात सुरक्षितता प्रदान करण्याच्या बाबतीत जे मानक ठरवले आहेत, ते कौतुकास्पद आहे.

हेही वाचाः Money Mantra : NPS खात्यातून पैसे काढण्याचे नियम बदलले, पैसे काढण्यापूर्वी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या

Akasa Air ही भारतीय शेअर बाजारातील दिग्गज राकेश झुनझुनवाला यांच्या कुटुंबाने गुंतवणूक केलेली एअरलाइन आहे. Akasa ने ऑगस्ट २०२२ मध्ये देशांतर्गत उड्डाणे सुरू केली. एअरलाइनने यापूर्वी ७६ बोईंग 737 मॅक्स विमानांची ऑर्डर दिली होती, त्यापैकी २२ विमाने वितरित करण्यात आली आहेत. ऑपरेशन सुरू केल्याच्या १७ महिन्यांच्या आत देशाच्या विमान वाहतूक क्षेत्रातील आकासा एअरचा वाटा ४ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. इंडिगो ही सर्वात मोठी विमान कंपनी आहे, ज्यांचा बाजार हिस्सा ६० टक्के आहे. तर एअर इंडिया आणि विस्तारासह टाटा समूहाच्या विमान कंपन्यांचा वाटा २६ टक्के आहे.

हेही वाचाः Money Mantra : आधार क्रमांक यापुढे जन्मतारखेचा पुरावा मानला जाणार नाही, EPFO ​​ने घेतला मोठा निर्णय

गेल्या वर्षी एअर इंडिया आणि इंडिगोने मोठ्या प्रमाणात विमाने खरेदी करण्याचा करार केला होता. इंडिगो नावाने काम करणाऱ्या इंटरग्लोब एव्हिएशनने ५०० नवीन एअरबस ए320 फॅमिली विमाने खरेदी करण्याची ऑर्डर दिली होती. ही विमाने २०२० ते २०३५ दरम्यान वितरित होण्याची अपेक्षा आहे. टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडियाने एअरबस आणि बोईंगबरोबर ४७० नवीन विमाने खरेदी करण्याचा करारही जाहीर केला होता.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Good day for the aviation sector akasa air orders 150 boeing 737 max aircraft vrd