Government Employees DA Salary : केंद्र सरकार लवकरच सरकारी कर्मचाऱ्यांना गिफ्ट देणार असल्याची चर्चा आहे. देशातील वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकार लवकरच केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता वाढवण्याची घोषणा करू शकते. एक कोटींहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्ता ४२ टक्क्यांवरून ४५ टक्क्यांपर्यंत वाढवला जाऊ शकतो. म्हणजेच महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ करण्याची शक्यता आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार किती वाढू शकतात यासंदर्भात जाणून घेऊ यात.

अशा प्रकारे DA ठरवला जातो

सध्या डीए ४२ टक्के आहे. कर्मचारी आणि पेन्शन धारकांसाठी दरमहा महागाई भत्ता कामगार ब्युरोने जारी केलेल्या सेंद्रिय कामगारांच्या CPI-IW च्या स्वरूपात निश्चित केला जातो. खरं तर कामगार ब्युरो ही कामगार मंत्रालयाची एक शाखा आहे. जून २०२३ साठी CPI-IW ३१ जुलै २०२३ रोजी निश्चित करण्यात आला. तसेच महागाई भत्त्यात चार टक्क्यांनी वाढ होण्याचीही शक्यता आहे. मात्र, सरकार महागाई भत्त्यात तीन टक्क्यांनी वाढ करू शकते.

8th Pay Commission Approved by By Government
8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! मोदी सरकारची आठव्या वेतन आयोगाला मंजुरी
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Direct tax rises 16 prcent to Rs 16.9 lakh crore in FY25
वैयक्तिक प्राप्तिकरातील वाढ अर्थव्यवस्थेसाठी वरदान; प्रत्यक्ष कर संकलन १२ जानेवारीपर्यंत १६.९० लाख कोटींवर
ITBP Recruitment 2025 news in marathi
नोकरीची संधी : ‘आयटीबीपी’त ५१ पदे रिक्त
eps 95 pension scheme loksatta
ईपीएस-९५ वाढीव पेन्शन धोक्यात, खासगी कंपन्यांचे असहकार्य
Industrial production rises to six month high of 5 2 in November print eco news
देशाची कारखानदारी रूळावर येत असल्याची सुचिन्हे!  नोव्हेंबरमध्ये औद्योगिक उत्पादन सहा महिन्यांच्या उच्चांकी  ५.२ टक्क्यांवर
Image Of L& T Chairman
रविवारीही काम करण्याचा सल्ला देणाऱ्या L&T च्या अध्यक्षांना कर्मचाऱ्यांपेक्षा ५०० पट अधिक वेतन, २०२३-२४ साठी मिळाले ५१ कोटी रुपये
Bhabha Atomic Research Centre
नोकरीची संधी

हेही वाचाः ५२ सोन्याच्या बोटी, ३८ विमाने आणि शेकडो कार; जगातील सर्वात श्रीमंत राजा आहे तरी कोण? जाणून घ्या संपत्ती

‘या’ दिवसापासून लागू होण्याची शक्यता

सध्या एक कोटीहून अधिक केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना ४२ टक्के महागाई भत्ता मिळत आहे. DA मधील शेवटची वाढ २४ मार्च २०२३ रोजी करण्यात आली आणि ती १ जानेवारी २०२३ पासून लागू करण्यात आली होती.

हेही वाचाः Money Mantra : तरुण गुंतवणूकदारांसाठी ५ आवश्यक गुंतवणुकीचे मंत्र, आजच फॉलो करा अन् बना श्रीमंत

खरं तर महागाई भत्ता वर्षातून दोनदा सुधारित केला जातो. २४ मार्च २०२३ रोजी महागाई भत्त्यात शेवटची सुधारणा करण्यात आली होती आणि ती १ जानेवारी २०२३ पासून लागू करण्यात आली होती. त्यावेळी सरकारने महागाई भत्त्यात ४ टक्क्यांनी वाढ करण्याची घोषणा केली होती.

Story img Loader