केंद्र सरकारने ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत खाद्यतेल मिळावे यासाठी त्यावरील मूलभूत आयात शुल्क कमी केले आहे. अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने गुुरुवारी याबाबतचा आदेश काढला. सरकारने सोयाबीन तेल आणि सूर्यफूल तेल यावरील मूलभूत आयात शुल्क गुरुवारपासून १७.५ टक्क्यांवरून कमी करून १२.५ टक्के केले आहे. सुधारित आयात शुल्क ३१ मार्च २०२४ पर्यंत लागू राहील. या निर्णयामुळे देशांतर्गत बाजारात खाद्यतेलाच्या किमती कमी होणार आहेत.

मूलभूत आयात शुल्क हा खाद्यतेलांच्या किमतीवर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक असतो. त्याचा परिणाम देशांतर्गत किमतींवर होतो. रिफाईन्ड सूर्यफूल आणि सोयाबीन तेलावरील आयात शुल्कात कपात केल्याने ग्राहकांना फायदा होणार आहे. यामुळे खाद्यतेलांच्या देशांतर्गत किरकोळ विक्री किमती घटण्यास मदत होईल. रिफाईन्ड सोयाबीन तेल आणि सूर्यफूल तेलावरील आयात शुल्क ऑक्टोबर २०२१ मध्ये ३२.५ टक्क्यांवरून कमी करून १७.५ टक्के करण्यात आले होते. खाद्यतेलाच्या आंतरराष्ट्रीय किमती २०२१ मध्ये खूप जास्त होत्या आणि देशांतर्गत किमतीवरही त्याचे परिणाम होत होते.

Announcements of organic natural farming Know how much the use of urea and other fertilizers has increased Mumbai news
सेंद्रीय, नैसर्गिक शेतीच्या फक्त घोषणाच; जाणून घ्या, युरियासह अन्य खतांचा वापर किती वाढला
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Property tax defaulters properties seized in Titwala
टिटवाळा येथे कर थकबाकीदारांच्या दोन कोटीच्या मालमत्तांना टाळे, पालिकेच्या अ प्रभागाची कारवाई
Ration Distribution delayed due to technical difficulties Nagpur news
 ‘सर्व्हर डाऊन’ ! राज्यात स्वस्त धान्य वाटप रखडले…
issue of ministery post between Devendra Fadnavis Eknath Shinde and Ajit Pawar is likely to be resolved in Delhi
खातेवाटपाचा पेच आता दिल्लीतच सुटण्याची शक्यता
Sugarcane Cultivation Kolhapur , Sugarcane ,
लोकशिवार… मुरमाड जमिनीतील उसाची दमदार लागवड
Devendra Fadnavis, Ajit Pawar, Eknath Shinde ,
खातेवाटपाच्या पेचामुळे दोन उपमुख्यमंत्री बिनखात्याचे
Cotton is a key kharif crop in India, with Maharashtra producing 90 lakh bales
बांगलादेशातील अराजकता अन् कापूस उत्पादकांना लाभ

पामतेल आयातीत घट, सूर्यफूल तेलात दुपटीने वाढ

भारताची पामतेल आयात मे महिन्यात १४.५९ टक्क्याने कमी होऊन ४ लाख ३९ हजार १७३ टनांवर आली आहे. याचवेळी कच्च्या सूर्यफूल तेलाची आयात मोठ्या प्रमाणात वाढली आहे आहे, अशी माहिती सॉल्व्हन्ट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशनने (एसईए) गुरूवारी दिली. मागील वर्षी मे महिन्यात पामतेलाची ५ लाख १४ हजार २२ टन आयात झाली होती.

हेही वाचाः भारत प्रामुख्याने ‘या’ दोन देशांतून येणाऱ्या पामतेलाची आयात घटली

याचबरोबर एकूण वनस्पती तेलाच्या आयातीतही यंदा किंचित घट झाली आहे. ही आयात मे महिन्यात १० लाख ५८ हजार २६३ टन आहे. मागील वर्षी मे महिन्यात ही आयात १० लाख ६१ हजार ४१६ टन होती. देशाच्या एकूण वनस्पती तेल आयातीत पामतेलाचा वाटा ५९ टक्के आहे. सूर्यफुल तेलाच्या आयातीत मेमध्ये वाढून २.९५ लाख टनांवर गेली आहे. मागील वर्षी मे महिन्यात ही आयात १.१८ लाख टन होती. भारत प्रामुख्याने इंडोनेशिया, मलेशियातून पामतेलाची आयात करतो. याचबरोबर अर्जेंटिनातून सोयाबीन तेल आणि युक्रेन व रशियातून सूर्यफूल तेलाची आयात केली जाते. आगामी काळात २२.०३ लाख टन खाद्यतेलाची देशात आयात होईल, असा ‘एसईए’चा अंदाज आहे.

हेही वाचाः वस्तू व्यापार तूट मे महिन्यात २२.१ अब्ज डॉलरच्या उच्चांकी पातळीवर; निर्यातीत १० टक्के घट

Story img Loader