कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर (EPF) मागील आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी ८.१५ टक्के व्याजदरास केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाने सोमवारी मंजुरी दिली. देशभरातील सहा कोटींहून अधिक पगारदार कर्मचारी-कामगार जे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे (ईपीएफओ) सदस्य आहेत, त्यांच्या खात्यात ही व्याजाची रक्कम लवकरच जमा केली जाणार आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) याबाबतचे परिपत्रक सोमवारी (२४ जुलै) काढले. यानुसार कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर ८.१५ टक्के व्याजाला मंजुरी देण्यात आली आहे.
आज परिपत्रक केले जारी
ईपीएफओ सदस्यांच्या खात्यात व्याजाची रक्कम जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ईपीएफओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने याबाबचा मागील आर्थिक वर्षासाठी ८.१५ टक्के व्याजदराचा प्रस्ताव मार्च महिन्यात केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाकडे पाठविला होता. त्याआधीच्या आर्थिक वर्षात हा व्याजदर ८.१० टक्के होता. हा गत चार दशकात पीएफ खातेदारांना दिला गेलेला सर्वात कमी व्याजाचा दर होता. त्यापेक्षा कमी म्हणजे ८ टक्के व्याजदर ईपीएफओने १९७७-७८ मध्ये दिलेला आहे. आता व्याजदरात वाढ केली गेली असली तरी ईपीएफओकडे २०२३-२४ आर्थिक वर्षासाठी ६६३.९१ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी शिल्लक राहणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ऑगस्ट २०२३ पासून व्याजाचे पैसे खात्यात पोहोचण्यास सुरुवात होणार आहे.
ईपीएफओ बोर्डाने मार्चमध्ये प्रस्ताव दिला होता
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, बोर्डाने यंदा मार्चमध्ये व्याजदर ८.१० टक्क्यांवरून ८.१५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव दिला होता. CBT च्या शिफारशीनंतर, व्याजदर वित्त मंत्रालयाकडून अधिसूचित केले जातात, त्यानंतरच त्यावरचे व्याज EPFO सदस्यांच्या खात्यात जमा केले जाऊ शकतात. सामान्यतः व्याजदर वित्त मंत्रालयाकडून आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत अधिसूचित केला जातो. त्यामुळेच सदस्य आर्थिक वर्ष २०२३च्या अधिसूचनेची वाट पाहत होते.
व्याजदर ४० वर्षांतील सर्वात कमी होता
महत्त्वाचे म्हणजे २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी EPFO ने EPF खात्यासाठी ८.१० टक्के व्याजदर निश्चित केला होता. हा जवळपास ४० वर्षांतील सर्वात कमी व्याजदर आहे. १९७७-७८ मध्ये EPFO ने ८ टक्के व्याजदर निश्चित केला होता. पण तेव्हापासून व्याजदर सातत्याने ८.२५ टक्के किंवा त्याहून अधिक वाढला आहे. आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये ८.६५ टक्के, २०१७-१८ मध्ये ८.५५ टक्के, २०१६-१७ मध्ये ८.६५ टक्के आणि २०१५-१६ या आर्थिक वर्षात ८.८ टक्के व्याज उपलब्ध होते.
कर्मचार्यांच्या पगारातून योगदान
कर्मचाऱ्याच्या पगारावर १२ टक्के योगदान ईपीएफ खात्यासाठी आहे. कर्मचार्यांच्या पगारातून नियोक्त्याने केलेल्या कपातीपैकी ८.३३ टक्के रक्कम EPS (कर्मचारी पेन्शन योजना) पर्यंत पोहोचते, तर ३.६७ टक्के EPF मध्ये पोहोचते. तुम्ही तुमच्या पीएफ खात्याचा सध्याचा बॅलन्स घरबसल्या सोप्या पद्धतीने तपासू शकता. यासाठी अनेक पर्याय देण्यात आले आहेत. उमंग अॅप, वेबसाइट किंवा तुमच्या मोबाइल फोनवरून एसएमएस पाठवून तुम्ही हे जाणून घेऊ शकता. देशभरात सुमारे ६.५ कोटी EPFO चे सदस्य ग्राहक आहेत.
EPFO पोर्टलवरून बॅलन्स तपासा
EPFO च्या अधिकृत वेबसाइटवर जा (www.epfindia.gov.in).
यानंतर ई-पासबुक या पर्यायावर क्लिक करा.
नवीन पेजवर UAN, पासवर्ड आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करा आणि लॉगिनवर क्लिक करा.
लॉग इन केल्यानंतर पासबुक पाहण्यासाठी सदस्य आयडी पर्याय निवडा.
आता तुम्हाला पासबुक पीडीएफ फॉरमॅटमध्ये मिळेल, जे डाऊनलोड केले जाऊ शकते.
तुम्ही https://passbook.epfindia.gov.in/ वर जाऊन थेट पासबुक पाहू शकता.
आता संपूर्ण माहिती तुमच्या समोर उघडेल.