देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी एक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेने (PNB) दिवाळीपूर्वी आपल्या ग्राहकांना गिफ्ट दिलं आहे. बँकेने विविध मुदत ठेवींवरील (FDs) व्याजदरात बदल केले आहेत, जे १ नोव्हेंबर २०२३ पासून लागू झाले आहेत.
पंजाब नॅशनल बँक १० वर्षांपर्यंत FD सुविधा देते, ज्यांचे व्याजदर ३.५ टक्क्यांपासून ७.२५ टक्क्यांपर्यंत सुरू होते. तुम्हाला PNB च्या FD कालावधीसाठी किती व्याज दिले जात आहे ते सांगणार आहोत.
कालावधी | सामान्य नागरिक | वरिष्ठ नागरिक |
७ ते १४ दिवसांसाठी | ३.५ टक्के | ४ टक्के |
३० दिवस ते ४५ दिवसांपर्यंत | ३.५ टक्के | ४ टक्के |
४६ दिवस ते ९० दिवस | ४.५ टक्के | ५ टक्के |
१८० दिवस ते २७० दिवसांपर्यंत | ६ टक्के | ६.५ टक्के |
२७१ दिवस ते १ वर्षापेक्षा कमी | ६.२५ टक्के | ६.७५ टक्के |
१ वर्ष | ६.७५ टक्के | ७.७५ टक्के |
२ वर्ष ते ३ वर्षांपेक्षा जास्त | ७ टक्के | ७.५ टक्के |
३ वर्ष ते ५ वर्षांपेक्षा जास्त | ६.५ टक्के | ७ टक्के |
५ वर्ष ते १० वर्षांपेक्षा जास्त | ६.५ टक्के | ७.३ टक्के |
PNB चे नवीन व्याजदर किती?
पीएनबीच्या अधिकृत वेबसाइटनुसार, बँकेने २ कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीसाठी व्याजदरांमध्ये काही सुधारणा केल्या आहेत, ज्याबद्दल तुम्हाला माहिती देण्यात आली आहे. PNB ने नवीन व्याजात १८० ते २७० दिवस आणि २७१ दिवसांच्या FD वरील व्याजदर एक वर्षापेक्षा कमी केले आहेत. उर्वरित कालावधीसाठी व्याजदर सामान्य ठेवण्यात आला आहे.