Google Pay Loan: जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक असलेल्या Google ने लोकांसाठी एक उत्तम सेवा आणली आहे. या सेवेमध्ये गुगलने सामान्य माणसाच्या छोट्या गरजा पूर्ण करण्यासाठी गुगल पे या पेमेंट अॅप प्रणालीद्वारे कर्ज देण्याची नवी योजना सुरू केली आहे.
गुगलच्या या नवीन ऑफरमुळे छोट्या व्यावसायिकांना १५,००० रुपयांपर्यंतचे कर्ज सहज मिळणार आहे. त्याची खास गोष्ट म्हणजे यासाठी तुम्हाला कोणत्याही बँकेत जावे लागणार नाही. Google Pay ने या १५,००० रुपयांच्या कर्जाला ‘सॅशे कर्ज’ असे नाव दिले आहे.
सॅशे कर्ज म्हणजे काय?
सॅशे लोन हे एक प्रकारचे लहान कर्जाचा प्रकार आहे. जी खूप कमी कालावधीसाठी उपलब्ध आहेत. त्याचा कार्यकाळ सात दिवसांपासून ते १२ महिन्यांपर्यंत असतो. गुगलने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. ३० हजार मासिक उत्पन्न असलेल्या लोकांना सॅशे कर्ज मिळू शकतो. ही गरज पूर्ण करण्यासाठी, Google Pay आणि DMIFinance सह सॅशे कर्ज सुरू केले जात आहे. यामध्ये १५ हजार रुपयांचे कर्ज उपलब्ध होणार असून ते ११ रुपयांच्या सुलभ हप्त्यांमध्ये फेडता येणार आहे.
(हे ही वाचा : हिरे खरेदी करणे झाले स्वस्त; जगभरात हिऱ्यांच्या किमतीत मोठी घसरण, जाणून घ्या ‘कारण’ )
गुगलची ही सेवा छोट्या व्यापाऱ्यांना खूप फायदेशीर ठरणार आहे. गुगलने कर्ज देण्यासाठी आयसीआयसीआय, एचडीएफसी, कोटक महिंद्रा आणि फेडरल बँक या चार बँकांशी करार केला आहे. गुगलने ही सेवा सध्या दोन टीअर शहरांमध्येच सुरू केली आहे. कर्जाचा लाभ कसा मिळवायचा ते जाणून घेऊया.
कर्जाचा लाभ कसा मिळवावा
- यासाठी सर्वप्रथम तुम्हाला गुगल पे बिझनेस ऑप्शनवर जावे लागेल.
- यानंतर, कर्ज विभागात जा आणि ऑफरवर टॅब करा.
- आता कर्जाची रक्कम निवडा आणि पुढील वर क्लिक करा.
- येथे केवायसीसह काही सोप्या पायऱ्या पूर्ण केल्यानंतर तुम्हाला कर्ज मिळेल.