नवी दिल्ली : गूगल इंडिया डिजिटल सर्व्हिसेस आणि एनसीपीआय इंटरनॅशनल पेमेंटने जागतिक पातळीवर इतर देशांमध्ये यूपीआय सेवांचा विस्तार करण्यासाठी सामंजस्य करार केला आहे.

या करारामुळे भारतीय प्रवाशांना रोख रक्कम किंवा आंतरराष्ट्रीय पेमेंट गेटवेवर जाण्याची गरज राहणार नसून ते गूगल पेद्वारे (ज्याला ‘जीपे’ म्हणूनही ओळखले जाते) इतर देशांमध्ये व्यवहार करण्यास सक्षम असतील.

Devendra Fadnavis claims that Ladaki Bahin Yojana will benefit everyone without discrimination
धर्मभेद न करता लाडकी बहीण योजनेचा सर्वांना लाभ; देवेंद्र फडणवीस यांचा दावा
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
congress leader rahul gandhi made serious allegations on pm modi in jharkhand
पंतप्रधान बड्या उद्योजकांचे हित जोपासतात; राहुल गांधी यांचा आरोप
traffic cleared due to police planning in Pune print news
पाेलिसांच्या नियोजनामुळे वाहतूक सुरळीत-पंतप्रधानांच्या सभेसाठी कडक बंदोबस्त
ST Corporation seeks permission from Election Commission for employee bonus Mumbai
कर्मचाऱ्यांच्या बोनससाठी एसटी महामंडळाचे निवडणूक आयोगाला साकडे; लवकरच ९० हजार कर्मचाऱ्यांना बोनस मिळण्याची शक्यता
RBI announces changes to KYC rules! How it will impact you
KYC : RBI ने केली KYC नियम बदलण्याची घोषणा, आपल्यावर नेमका कसा परिणाम होणार?
Narendra Modi  statement on Ratan Tata as a leader and personality who cares for the weak
दुर्बलांची काळजी घेणारे नेतृत्व आणि व्यक्तिमत्त्व: रतन टाटा
Office Space, Pune, Mumbai, Delhi,
कार्यालयीन जागा सहकार्यात पुण्याचा झेंडा! मुंबई, दिल्लीला मागे टाकत देशात दुसऱ्या स्थानी झेप

हेही वाचा >>> गुंतवणूकदारांची अदानींच्या ‘या’ कंपन्यांचे शेअर खरेदी करण्यासाठी गर्दी 

या सामंजस्य कराराची तीन प्रमुख उद्दिष्टे आहेत. प्रथम, भारताबाहेरील प्रवाशांसाठी यूपीआयचा वापर वाढवणे, त्यांना परदेशात सोयीस्करपणे व्यवहार करण्यास सक्षम करणे. तिसरे, इतर देशांमध्ये यूपीआयसारखी डिजिटल देयक प्रणाली स्थापन करण्यात मदत करण्याचा या सामंजस्य कराराचा हेतू आहे.

हा करार यूपीआयच्या पायाभूत सुविधांचा वापर करून देशांमधील ‘रेमिटन्स’ची प्रक्रिया सुलभ करण्यावर लक्ष केंद्रित करतो, ज्यामुळे सीमापार आर्थिक देवाणघेवाण सुलभ होण्यास मदत होईल. करारामुळे यूपीआयची जागतिक उपस्थिती मजबूत होऊन परदेशी व्यापाऱ्यांना भारतीय ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. डिजिटल देयकांच्या माध्यमातून व्यवहार करण्यासाठी यापुढे केवळ परदेशी चलन आणि/किंवा क्रेडिट किंवा फॉरेक्स कार्डवर अवलंबून राहावे लागणार नाही आणि त्यांना भारतातील यूपीआय समर्थित गूगल पेसह इतर अॅप वापरण्याचा पर्याय उपलब्ध होईल.