वृद्धीला दिलेला वेग, वाढलेली कार्यक्षमता आणि अतूट विश्वास यांच्या बळावर सरकारी ई-मार्केटप्लेस (GEM) ने अत्यंत नेत्रदीपक मैलाचा टप्पा गाठत सकल व्यापारी मूल्यात एक लाख कोटी रुपयांचा व्यवहार चालू आर्थिक वर्षातील १४५ दिवसांतच पूर्ण केला आहे. ही अद्वितीय कामगिरी जीईएमची सरकारी खरेदी प्रक्रियेत क्रांतिकारक बदल घडविण्याच्या कटिबद्धतेचे द्योतक आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तसेच गेल्या वर्षीच्या तुलनेत जीईएमच्या कामगिरीत लक्षणीय सुधारणा झाली आहे. गेल्या वर्षी हा आकडा २४३ दिवसांत पार केला होता. दररोजचा घाऊक व्यापार देखील गेल्यावर्षीच्या ४१२ कोटी रुपयांच्या तुलनेत यंदा ६९० कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे. खरं तर जीईएमने वर्ष २०२३-२४ मध्ये १४५ दिवसांत एक लाख कोटींचा आकडा पार केला आहे; गेल्यावर्षी हा आकडा २४३ दिवसांत पार केला होता.

हेही वाचाः टाटा समूहात मोठ्या पदावर असलेल्या माया टाटा कोण? रतन टाटांशी संबंध काय?

या उल्लेखनीय यशामुळे जीईएम, व्यवहार मूल्य आणि खरेदीदार-विक्रेत्याच्या नेटवर्कची व्याप्ती या दोन्ही बाबतीत जागतिक स्तरावरील सर्वात मोठ्या सार्वजनिक खरेदी पोर्टलपैकी एक म्हणून प्रस्थपित करीत आहे.

हेही वाचाः इंग्रजांच्या लुटीनेच भारताला गरीब केले, चांद्रयानासंदर्भातील बीबीसीच्या प्रश्नावर आनंद महिंद्रा संतापले; व्हिडीओ व्हायरल

स्थापनेपासून GeM पोर्टलने सकल व्यापार मूल्यात ४.९१ लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे आणि प्लॅटफॉर्मवर १.६७ कोटी ऑर्डर्सची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Government e marketplus crosses the one lakh crore gross trade value milestone in record time vrd
Show comments