GST Rates on Electronic Items: आजपासून भारतीयांना स्मार्टफोन, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीनसह सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्यासाठी खिसा जास्त रिकामा करावा लागणार नाही, कारण सरकारने आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. वास्तविक, सरकारने जीएसटी दर कमी केला आहे, त्यानंतर ही उपकरणे खरेदी करणे खूप किफायतशीर होईल. सरकारने जीएसटी दर ३१.३ टक्क्यांवरून कमी केला आहे.

जिथे आधी ग्राहकांना ही उपकरणे खरेदी करण्यासाठी पैसे खर्च करावे लागत होते, तिथे आता ३१.३ टक्के GST भरण्याऐवजी आता ग्राहकांना फक्त १८ ते १२ टक्के GST भरावा लागेल, त्यानंतर तुम्ही स्वतःच अंदाज लावू शकता की उपकरणे खरेदी करणे किती फायदेशीर ठरेल. ही माहिती अर्थ मंत्रालयाने जारी केली आहे. ही माहिती समोर आल्यानंतर आता लोकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे, कारण आता ही उपकरणे स्वस्त दरात घरी आणता येणार आहेत.

(हे ही वाचा : तुम्हीही टॉयलेटमध्ये प्रिय स्मार्टफोन वापरता का? सावधान! ‘या’ रिपार्टने केला खुलासा, धक्कादायक माहिती समोर)

या निर्णयानंतर ग्राहकांना स्मार्टफोन खरेदीसाठी १२ टक्के, गृहोपयोगी वस्तू खरेदीसाठी १८ टक्के ते ३१.३ टक्के GST दर भरावा लागेल. याचा अर्थ उत्पादनानुसार जीएसटी दर कमी किंवा जास्त असेल, परंतु तरीही ग्राहक खूप बचत करू शकतात.

सरकारने मोबाईल फोन, एलईडी, टीव्ही फ्रिजसहित इलेक्ट्रॉनिक वस्तूवरील जीएसटी दर कमी केला आहे. यामुळे मोबाईल फोन, स्मार्ट टीव्ही, एलईडी बल्ब, फ्रिज, यूपीएस, कपडे धुण्याची मशीन या वस्तूवरील ३१.३ टक्के जीएसटी कमी करून १२ टक्के केला आहे. यामुळे इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार आहे.

‘या’ इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळणार स्वस्त

  • रिफ्रेजरेटर 
  • टीव्ही (२७ इंचापेक्षा कमी)
  • मोबाईल फोन
  • वॉशिंग मशीन
  • इलेक्ट्रिक अप्लायन्स (मिक्सर, व्हॅक्युम क्लिनर, ज्युसर)
  • एलपीजी शेगडी
  • व्हक्युम फ्लास्क 
  • एलईडी बल्ब 
  • प्रेशर लॅन्टर्न
  • स्टॅटिक कन्व्हर्टर्स
  • शिलाई मशीन