नवी दिल्ली : सूक्ष्म, लघू व मध्यम (एसएमई) उद्योगांसाठी करोनाकाळात सुरू केलेल्या ‘सीजीटीएमएसई’ योजनेला आणखी दोन वर्षे मुदतवाढ देण्याबाबत केंद्राचा विचार सुरू असून, या अंतर्गत पतहमी म्हणून अतिरिक्त ५ लाख कोटी रुपयांची तरतूदही प्रस्तावित केली गेली आहे. उद्योग क्षेत्राची संघटना ‘फिक्की’च्या वतीने आयोजित कार्यक्रमात अतिरिक्त सचिव (सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग) व विकास आयुक्त रजनीश यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, सूक्ष्म व लघु उद्योग कर्ज हमी निधी ट्रस्टच्या (सीजीटीएमएसई) माध्यमातून गत दोन वर्षांत एकूण ४ लाख कोटी रुपयांची पतहमी दिली गेली. मात्र आधीच्या २२ वर्षात त्यापोटी केवळ २.६ लाख कोटी रुपयांची पतहमी देण्यात आली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> टाटा मोटर्सकडून ‘ईव्ही’च्या किमतीत तीन लाखांपर्यंत कपात

पुढील दोन वर्षांत या माध्यमातून आणखी ५ लाख कोटी रुपयांची पतहमी छोट्या उद्योगांना देण्यात येईल, असे त्यांनी संकेत दिले. गेल्या काही वर्षांत सरकारने सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (एमएसएमई) संघटित क्षेत्रात यावेत यासाठी भरीव काम केले आहे. यासाठी केंद्र सरकारकडून राज्य सरकार आणि उद्योग संघटना यांच्यासोबत संयुक्त मोहीम राबविली जात आहे. ‘उद्यम’ या पोर्टलवर नोंदणीकृत असलेल्या एमएसएमईंची संख्या वर्षभरापूर्वी १.६५ कोटी होती आणि आता ती ५ कोटींवर पोहोचली आहे, असे रजनीश यांनी नमूद केले.