पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी देशातील ५१ हजार नवनियुक्त लोकांना नियुक्ती पत्रे दिली आहेत. या नवनियुक्त लोकांची विविध विभागातील विविध पदांसाठी निवड करण्यात आली आहे. नवनियुक्त कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, या रोजगार मेळाव्यामुळे संपूर्ण यंत्रणा पारदर्शक झाली आहे. त्यामुळे तरुणांचा भरती प्रक्रियेवर विश्वास निर्माण झाला आहे. रोजगार मेळाव्यात भरती प्रक्रियेचा कालावधी कमी झाला आहे, असंही त्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रोजगार मेळाव्याचे आयोजन ऑनलाइन करण्यात आले आणि पंतप्रधानांनी डिजिटल माध्यमातून सर्वांशी संपर्क साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, रोजगार मेळाव्याने तरुणांची भरतीची चिंता दूर केली आहे आणि आता त्यांना लवकरात लवकर नियुक्ती मिळते आहे. ते म्हणाले की, अनेक क्षेत्रांचा झपाट्याने विकास होत असून, त्यामुळे युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत.

हेही वाचाः ‘पंतप्रधान मोदी रोज १४-१६ तास काम करतात;’ उद्योगपती सज्जन जिंदाल यांच्याकडून नारायण मूर्तींच्या विधानाचं समर्थन

तरुणांना कोणत्या विभागात नोकऱ्या मिळाल्या?

शनिवारी देशातील ३७ ठिकाणी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या रोजगार मेळाव्याअंतर्गत केंद्र तसेच केंद्रशासित प्रदेश आणि राज्यांच्या विभागांमध्ये नवनियुक्त कर्मचाऱ्यांना जॉयनिंग लेटर देण्यात आले. या तरुणांना रेल्वे मंत्रालय, टपाल विभाग, गृह मंत्रालय, महसूल विभाग, उच्च शिक्षण विभाग, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग आणि मंत्रालयासह विविध मंत्रालयांमध्ये नोकऱ्या मिळाल्या आहेत.

हेही वाचाः Muhurat Trading 2023 : दिवाळीतही तुम्हाला ट्रेडिंग करता येणार, पैसे कमावण्याचा ‘शुभ मुहूर्त’काय? शेअर बाजाराची घोषणा

रोजगार मेळावा अन् मोदी सरकारचा विशेष उपक्रम

पीएमओच्या मते, रोजगार मेळावा रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या पंतप्रधानांच्या पुढाकाराची पूर्तता करण्याच्या दिशेने एक विशेष पाऊल आहे. युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात रोजगार मेळावा महत्त्वाची भूमिका बजावेल, अशी अपेक्षा आहे. त्यांच्या विकासातही ते अर्थपूर्ण भूमिका बजावेल.

स्वतःला प्रशिक्षित करण्याची संधी

सरकारने नवनियुक्त कर्मचाऱ्यांसाठी iGOT कर्मयोगी पोर्टल विकसित केले आहे. हे पोर्टल तरुणांना स्वतःला प्रशिक्षण देण्याची संधी देखील देते. येथे तुम्हाला कोणत्याही डिव्हाइसवरून कुठेही शिकण्याची संधी मिळते. या पोर्टलवर ७५० हून अधिक ई-लर्निंग कोर्सेस उपलब्ध आहेत.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Government jobs more than 51 thousand youth got government jobs distribution of appointment letters by prime minister narendra modi vrd
Show comments