नवी दिल्ली : केंद्र सरकारचा सार्वजनिक क्षेत्रातील आणखी काही बँकांच्या विलीनीकरण करण्याचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नसल्याचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी मंगळवारी संसदेत स्पष्ट केले. केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी अनेक पावले गेल्या काही वर्षांत उचलली आहेत. बँकिंग क्षेत्रात प्रणालीगत सुधारणा घडवून आणल्या गेल्या आहेत. त्यामुळे सध्या विलीनीकरणाबाबत कोणताही विचार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा >>> Stock Market Updates : सेन्सेक्सला बळ; रुपया अशक्त

banking laws amendment bill passed in lok sabha
बँकांमध्ये प्रशासकीय व्यावसायिकता, ग्राहक सेवेत सुलभता; बँकिंग कायदे (सुधारणा) विधेयक लोकसभेकडून संमत 
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
Sachin Tendulkar Meets Vinod Kambli
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli : सचिन भेटायला आला पण विनोद कांबळीला उभंही राहता आलं नाही, मैत्रीतला ‘तो’ क्षण राज ठाकरेही पाहातच राहिले!
stock market update sensex rises over 597 points to settle at 80845 nifty surge 181 points close at 24457
Stock Market Updates : सेन्सेक्सला बळ; रुपया अशक्त
tata motors launches re wi re vehicle scrapping facility in pune
टाटांची पुण्यात अभिनव ‘रिवायर’ सुविधा; वर्षाला २१ हजार जुनी वाहने भंगारात काढण्याची क्षमता
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
mharashtra total registered voters
अग्रलेख : अवघा हलकल्लोळ करावा…

आतापर्यंत विलीनीकरण झालेल्या सरकारी बँकांनी भांडवली पर्याप्तता गुणोत्तर आणि त्यांच्या एकूण बुडीत मालमत्तेच्या स्थितीत सुधारणा दर्शविली आहे. केंद्र सरकारने सरकारी बँकांना स्पर्धात्मक बनवत, त्यांना जागतिक पटलावर आणण्याच्या उद्देशाने केलेल्या त्यांच्या विलीनीकरणांतून, २७ सरकारी बँकांची संख्या कमी होऊन ती १२ वर आली. या प्रक्रियेत आतापर्यंत, युनायटेड बँक ऑफ इंडिया आणि ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्सचे पंजाब नॅशनल बँकेत विलीनीकरण करण्यात आले, तर कॅनरा बँकेमध्ये सिंडिकेट बँक, इंडियन बँकेमध्ये अलाहाबाद बँक आणि युनियन बँकेमध्ये आंध्र बँक आणि कॉर्पोरेशन बँकेचे विलीनीकरण झाले आहे. हे विलीनीकरण १ एप्रिल २०२० पासून लागू करण्यात आले. तर त्याआधी वर्ष २०१९ मध्ये देना बँक आणि विजया बँकेचे बँक ऑफ बडोदामध्ये विलीनीकरण करण्यात आले. तर देशातील सर्व मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेमध्ये आणि भारतीय महिला बँकेसह तिच्या पाच सहयोगी बँकांचे विलीनीकरण केले गेले आहे.