मुंबई : अमेरिकी गुंतवणूकदार कंपनी ‘जीक्यूजी पार्टनर्स’, नॅशनल पेन्शन सिस्टम ट्रस्ट आणि एसबीआय लाईफ इन्शुरन्स यासह अनेक प्रमुख गुंतवणूकदारांनी शुक्रवारी अदानी समूहातील कंपनी अंबुजा सिमेंटमधील हिस्सेदारी खरेदी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अंबुजा सिमेंटमधील हिस्सा विक्रीच्या माध्यमातून अदानी कुटुंबीयांनी ४,२५१ कोटी रुपयांचा निधी उभा केला आहे. या समभाग विक्रीतून मिळालेला निधी अदानी समूहातील इतर कंपन्यांमधील गुंतवणुकीला गती देण्यासाठी केला जाणार आहे. हा व्यवहार म्हणजे अदानी कुटुंबाच्या पोर्टफोलिओचे व्यवस्थापन आणि समतोल साधण्याच्या प्रक्रियेचा एक भाग आहे.

हेही वाचा…सोन्यापेक्षा चांदीने दिले अधिक ‘रिटर्न’

ब्लॉक डीलच्या माध्यमातून हा व्यवहार पार पडला असून सोमवारपासून अनेक कंपन्यांमध्ये सुमारे २०,००० कोटी रुपयांचे व्यवहार पार पडले आहेत.

बाजारमंचांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, अंबुजा सिमेंटचे सुमारे १,६७९ कोटी रुपयांचे समभाग ‘जीक्यूजी पार्टनर्स’ने खरेदी केले असून या व्यवहारात तो सर्वात मोठा खरेदीदार होता. नॅशनल पेन्शन सिस्टम ट्रस्टने ५२५ कोटी रुपये मूल्याचे, तर एसबीआय लाइफ इन्शुरन्सने ५०० कोटी रुपयांचे समभाग खरेदी केले आहेत. प्रतिसमभाग ६२५ रुपयांप्रमाणे ही समभाग विक्री पार पडली. दिवसअखेर समभाग ६३३.६० रुपयांवर स्थिरावला. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार, कंपनीचे १.५६ लाख कोटी रुपयांचे बाजार भांडवल आहे.

हेही वाचा…निर्देशांकांची सलग सातव्या सत्रात वाढ; पॉवेल यांच्या भाषणापूर्वी मात्र सावध पवित्रा

१०० अब्ज डॉलर गुंतवणुकीची योजना

अदानी कुटुंबाच्या समूह कंपन्यांमधील त्यांचा हिस्सा ३ टक्क्यांने कमी करण्याच्या योजनेचा हा एक भाग आहे. सध्या समूहातील बहुतांश सूचिबद्ध कंपन्यांचे समभाग त्यांच्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीजवळ व्यवहार करत आहेत. अदानी समूहाने पुढील दशकभरात पायाभूत सुविधा क्षेत्रात १०० अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी, समूह केवळ चालू आर्थिक वर्षात १५ अब्ज डॉलरची गुंतवणूक करेल.