वृत्तसंस्था, नवी दिल्ली

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशातील निर्मिती क्षेत्राच्या सक्रियतेचा वेग ऑक्टोबरमध्ये आठ महिन्यांतील नीचांकी पातळीवर घसरला. नवीन कार्यादेश, उत्पादन आणि खरेदी पातळी यातील वाढ मंदावल्याने निर्मिती क्षेत्राच्या सक्रियतेवर परिणाम झाल्याचे मासिक सर्वेक्षणाच्या बुधवारी आलेल्या निष्कर्षातून समोर आले.

एस ॲण्ड पी ग्लोबल इंडियाने निर्मिती उद्योगातील कंपन्यांच्या खरेदी व्यवस्थापकांमध्ये केलेल्या सर्वेक्षणाअंती काढलेला पीएमआय निर्देशांक ऑक्टोबर महिन्यात ५५.५ गुणांकावर नोंदवण्यात आला. तो सप्टेंबर महिन्यात ५७.५ गुणांकावर होता. तर मार्च महिन्यात हा निर्देशांक ५६.४ गुणांकावर होता. ऑक्टोबर महिन्यात निर्देशांकाने त्यानंतरची नीचांकी पातळी गाठली आहे. असे असले तरी निर्देशांक ५० गुणांकाच्या वर असल्याने त्याची विस्तारपूरकता ऑक्टोबरमध्ये कायम राहिली आहे. हा गुणांक ५० च्या वर असल्यास विस्तारपूरकता आणि त्याखाली असल्यास आकुंचन दर्शवतो.

हेही वाचा… लॅपटॉप आयातीसाठी ११० कंपन्यांचे परवाने मंजूर; ॲपल, डेल, लिनोव्होसह इतर कंपन्यांचा समावेश

एस अँड पी ग्लोबलच्या माहितीनुसार, रोजगार भरती आणि व्यवसाय आत्मविश्वास हे ऑक्टोबरमध्ये पाच महिन्यांतील नीचांकी पातळीवर घसरले आहेत. याचवेळी महागाई कमी होऊनही उत्पादनांवर किमतीचा दबाव कायम आहे. नवीन कार्यादेशाचे प्रमाण एक वर्षातील नीचांकी पातळीवर घसरले आहे. अनेक कंपन्यांनी त्यांच्या उत्पादनांच्या मागणीबाबत चिंता व्यक्त केली आहे. ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्रात सर्वाधिक घट नोंदविण्यात आली आहे. या क्षेत्रातील विक्री, उत्पादन, निर्यात, कच्चा माल आणि खरेदी पातळी या सर्वच बाबतीत सौम्य वाढ नोंदविण्यात आली आहे.

हेही वाचा… आता परदेशात शेअरचे लिस्टिंग होणार

निर्मिती क्षेत्रावर महागाईचा दबाव कायम आहे. कच्च्या मालाच्या किमतीत मध्यम वाढ झाल्याचा फटका ग्राहकांना बसत आहे. याचवेळी अनेक कंपन्यांनी त्यांच्या उत्पादनांच्या मागणीबाबत चिंता व्यक्त केली आहे. – पॉलियाना डी लिमा, अर्थतज्ज्ञ, एस अँड पी ग्लोबल मार्केट इंटेलिजन्स

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Growth of manufacturing sector slowed down an eight month low in october print eco news asj
Show comments