वृत्तसंस्था, नवी दिल्ली

भारताच्या विकास दराचा अंदाज फिच रेटिंग्जने मध्यम कालावधीसाठी ५.५ टक्क्यांवरून ७० आधारबिंदूंनी वाढवून ६.२ टक्क्यांवर नेला आहे. याच वेळी १० विकसनशील अर्थव्यवस्थांच्या विकास दराचा अंदाज ४.३ टक्क्यांवरून ४ टक्क्यांवर आणण्यात आला आहे.

Gold Silver Price Today 20 November 2024 in Marathi| maharashtra election result 2024
Gold Silver Price Today : महाराष्ट्र निवडणुक निकालापूर्वी सोन्याच्या दरात मोठी वाढ; खरेदी पूर्वी जाणून घ्या आजचे दर
wipro bonus share issue
‘विप्रो’कडून बक्षीस समभाग पात्रतेसाठी ३ डिसेंबर रेकॉर्ड तारीख…
stock market updates
बाजाराच्या आकस्मिक मुसंडीमागे, मतदानोत्तर चाचण्यांचा ‘कौल’?
adani group misled indian capital market
अदानींकडून भारताच्या भांडवली बाजाराचीही दिशाभूल?
sebi rules violation loksatta news
‘सेबी’कडून प्रकटन नियमाच्या उल्लंघनाची चौकशी

जागतिक पतमानांकन संस्था ‘फिच’ने सोमवारी जाहीर केलेल्या अहवालानुसार, चीनच्या पुरवठा साखळीतील वाढीत ०.७ टक्के घट होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे चीनच्या विकास दराचा अंदाज मध्यम कालावधीसाठी ५.३ टक्क्यांवरून तिने ४.६ टक्क्यांवर आणला आहे. याच वेळी भारत आणि मेक्सिको यांच्या विकासदर अंदाजात वाढसूचक सुधारणा करण्यात आली आहे. कारण रोजगाराच्या स्थितीत सुधारणा आणि लोकसंख्येत कामकरी वयातील तरुणांचे प्रमाणही वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे भारताचा विकास दर अंदाज ५.५ टक्क्यांवरून ६.२ टक्के आणि मेक्सिकोचा विकास दर अंदाज १.४ टक्क्यांवरून २ टक्क्यांवर नेण्यात आला आहे. ब्राझील, इंडोनेशिया, पोलंड आणि तुर्कस्तान या अन्य उभरत्या अर्थव्यवस्थांच्या विकासदरात वाढीचा ‘फिच’चा कयास आहे.

आणखी वाचा-अवैध ‘लोन ॲप’च्या मायाजाळाला वेसण!

‘फिच’ने स्पष्ट केले आहे की, चालू आर्थिक वर्षात भारताचा विकास दर ६.३ टक्के राहील. भारतातील रोजगाराच्या दरात वाढ होत आहे. त्याच वेळी रोजगारक्षम लोकसंख्येमध्ये थोडी वाढ होणार आहे. तसेच, भारताच्या रोजगार उत्पादकता अंदाजातही वाढ करण्यात आली आहे.

करोनापूर्व पातळी गाठणे अशक्य

चीनसह रशिया, दक्षिण कोरिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्या विकास दराचा सुधारित अंदाज ‘फिच’ने जाहीर केला आहे. या देशांच्या विकास दराचा अंदाज घटविण्यात आला आहे. त्यात विकास दराचा अंदाज रशियासाठी १.६ टक्क्यांवरून ०.८ टक्के, दक्षिण कोरिया २.३ टक्क्यांवरून २.१ टक्के आणि दक्षिण आफ्रिका १.२ टक्क्यांवरून १ टक्के करण्यात आला आहे. सर्व १० विकसनशील अर्थव्यवस्थांमध्ये ब्राझील आणि पोलंडचा अपवाद वगळता इतर देशांचे विकास दर हे करोना संकटाच्या आधीच्या पातळीपेक्षा कमी राहतील, असे ‘फिच’ने म्हटले आहे.