पीटीआय, नवी दिल्ली
सरलेल्या डिसेंबरमध्ये वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटीच्या रूपाने १.७७ लाख कोटी रुपये गोळा केले गेले. गेल्या वर्षी, डिसेंबर २०२३ मध्ये १.६५ लाख कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले होते, त्या तुलनेत ते यंदा ७.३ टक्क्यांनी वाढले आहे, असे केंद्रीय अर्थमंत्रालयाने बुधवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीने स्पष्ट केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डिसेंबर महिन्यातील एकूण १,७६,८५७ कोटी रुपयांच्या जीएसटी महसुलात, केंद्रीय वस्तू व सेवा करापोटी (सीजीएसटी) ३२,८३६ कोटी रुपये, राज्य वस्तू व सेवा करापोटी (एसजीएसटी) ४०,४९९ कोटी रुपये, तर एकात्मिक वस्तू व सेवा करापोटी ४७,७८३ कोटी रुपये आणि ११,४७१ कोटी रुपये उपकरातून जमा झाले आहेत. त्याआधीच्या नोव्हेंबरमध्ये जीएसटी संकलन ८.५ टक्के वार्षिक वाढीसह १.८२ लाख कोटी रुपये राहिले होते. तर एप्रिल २०२४ मध्ये आतापर्यंतचे सर्वाधिक २.१० लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक संकलन झाले होते.

हेही वाचा : गूगलपे, फोनपेला ‘एनपीसीआय’कडून दिलासा

डिसेंबर महिन्यात २२,४९० कोटी रुपयांचा परतावा जारी करण्यात आला, जो मागील वर्षाच्या तुलनेत ३१ टक्क्यांनी वाढला आहे. परतावा वजा केल्यानंतर, निव्वळ जीएसटी संकलन ३.३ टक्क्यांनी वाढून १.५४ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gst collection at rupees 1 77 lakh crore in december 2024 print eco news css