जुलैमध्ये सकल जीएसटी संकलन ११ टक्क्यांनी वाढून १.६५ लाख कोटी रुपये झाले आहे. जीएसटी संकलनाचा आकडा १.६ लाख कोटींचा टप्पा ओलांडण्याची ही पाचवी वेळ आहे.सरकारला गेल्या महिन्यात सकल वस्तू आणि सेवा कर (GST) मधून एकूण १,६५,१०५ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. यापैकी २९,७७३ कोटी रुपये केंद्रीय जीएसटी, ३७,६२३ कोटी रुपये राज्य जीएसटी आणि ८५,९३० कोटी रुपये आयजीएसटी म्हणून प्राप्त झाले आहेत. IGST मध्ये आयात केलेल्या वस्तूंवर जमा झालेल्या ४१,२३९ कोटी रुपयांच्या कराचा समावेश आहे. याशिवाय उपकर म्हणून ११,७७९ कोटी रुपये जमा झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अर्थ मंत्रालयाने निवेदन केले जारी

अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वार्षिक आधारावर जीएसटी महसुलात ११ टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे देशांतर्गत व्यवहारातून मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ झाल्याचं चित्र समोर आलं आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत हे प्रमाण १५ टक्क्यांनी अधिक आहे. जीएसटी संकलनाचा आकडा १.६० लाख कोटींच्या पुढे गेल्याची ही पाचवी वेळ आहे.

हेही वाचाः जन धन खात्यातील एकूण ठेवी २ लाख कोटींच्या पुढे; सरकारची लोकसभेत माहिती

हेही वाचाः LPG Price : खुशखबर! एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठी कपात, ‘ही’ आहे नवी किंमत

जूनमध्ये ते संकलन १,६१,४९७ कोटी रुपये होते. IGST संकलनापैकी ३९,७८५ कोटी रुपये CGST आणि ३३,१८८ कोटी रुपये SGST ला सरकारने दिले आहेत. सेटलमेंटनंतर ६९,५५८ कोटी रुपयांचा सीजीएसटी महसूल आणि ७०,८११ कोटी रुपयांचा एसटीएसटी महसूल प्राप्त झाला आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gst collection bumper gst collection in july figure crosses rs 1 65 lakh crore vrd
Show comments