नवी दिल्ली : वस्तू आणि सेवा करापोटी (जीएसटी) जानेवारीमध्ये १०.४ टक्क्यांनी वाढून १.७२ लाख कोटींवर पोहोचले आहे, असे अर्थमंत्रालयाने बुधवारी सांगितले. हे आतापर्यंतचे दुसरे-सर्वोच्च मासिक संकलन आहे आणि विद्यमान आर्थिक वर्षात १.७० लाख कोटींहून अधिक कर संकलनाचा हा तिसरा महिना आहे, असे अर्थमंत्रालयाने म्हटले आहे.
हेही वाचा >>> RBI ने पेटीएम पेमेंट्स बँकेवर घातली बंदी, २९ फेब्रुवारीपासून बँक कोणत्याही ठेवी स्वीकारणार नाही
जानेवारी २०२४ मध्ये एकत्रित जीएसटी महसूल १,७२,१२९ कोटी रुपये गोळा झाला असून गेल्यावर्षी याच महिन्यात ( जानेवारी २०२३) १,५५,९२२ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला होता. एप्रिल २०२३ ते जानेवारी २०२४ या दहा महिन्यांच्या कालावधीत, एकत्रित जीएसटी संकलनात वार्षिक ११.६ टक्के वाढ झाली. या दहा महिन्यात जीएसटीच्या माध्यमातून १६.६९ लाख कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. जो गेल्यावर्षी पहिल्या दहा महिन्यांमध्ये १४.९६ लाख कोटी राहिला होता. एप्रिल २०२३ मध्ये १.८७ लाख कोटी रुपयांचे आतापर्यंतचे सर्वाधिक जीएसटी संकलन नोंदवले गेले होते.