Today’s Gold Silver Price of Gudi Padwa 2025 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला गुढीपाडवा हा सण सर्वात शुभ मानला जातो. गुढीपाडव्याच्या दिवशी सोन्या-चांदीचे मौल्यवान दागिने, नवीन वस्तू खरेदी करणं शुभ मानलं जातं. त्यामुळे अनेक ग्राहक सोन्या- चांदीचे दागिने खरेदी करण्यास पसंती देतात. त्यामुळे सराफा बाजारपेठांमध्येही सोने -चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळतेय. पण गेल्या काही दिवसांपासून सोन्या- चांदीच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसतेय. यातच गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी म्हणजे २९ मार्च रोजी सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्याचे दिसून आले. प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ९० हजारांवर पोहोचला आहे तर १ किलो चांदीचा दर १ लाखांच्या पार गेला आहे. पण आज तुमच्या शहरात आज सोन्या- चांदीचा दर नेमका काय आहे जाणून घेऊ….

गुढीपाडव्याच्या तोंडावर सोन्याच -चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. बुलियन मार्केटनुसार, आज देशात २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर ८९,३२० रुपये आहे. तर २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर ८१, ८७७ रुपये आहे. याशिवाय १० ग्रॅम चांदीचा दर १,००८ रुपये आहे. तर आज १ किलो चांदीचा दर १००,७६० रुपये झाला आहे. आदल्या दिवशीच्या तुलनेत ही वाढ मोठी आहे.

काही दिवसांपूर्वी सोन्याच- चांदीच्या दरात घसरण झाली होती. त्यामुळे ग्राहकांना काहीप्रमाणात का होईना दिलासा मिळाला होता, मात्र ऐन गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दरात वाढ झाल्याने ग्राहकांचा हिरमोड झाल्याचे दिसत आहे. यात मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरसारख्या मोठ्या शहरांमध्ये सोन्या- चांदीचा काय दर आहे जाणून घेऊ…

पाहा तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचा दर (Gold Silver Price On Gudi Padwa Shubh Muhurt)

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार जाणून घेऊया तुमच्या शहरांमधील सोन्या-चांदीचे दर

शहर२२ कॅरेट सोन्याचा दर२४ कॅरेट सोन्याचा दर
मुंबई२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ८१, ७३० रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याची किंमत ८९, १६० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ८१, ७३० रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ८९, १६० रुपये आहे.
नागपूर२२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ८१, ७३० रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ८९,१६० रुपये आहे.
नाशिक२२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ८१, ७३० रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ८९, १६० रुपये आहे.
पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे?

२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.

सोने खरेदी करताना हॉलमार्क का महत्त्वाचा?

हॉलमार्कचा उद्देश सोन्याची पारदर्शकता तपासणे होय. दागिन्यांमध्ये किती कॅरेट सोन्याचा समावेश आहे हे हॉलमार्कसह लिहिले जाते. या युनिक कोडद्वारे दागिने शोधणे सोपी होते.सोन्याची पारदर्शकता तपासणे आहे.१ एप्रिल २०२३ पासून, केंद्र सरकारच्या नवीन नियमानुसार हॉलमार्कशिवाय कोणतेही दागिने बाजारात विकता येत नाहीत.