केवळ निम्मेच काम फत्ते झाले आहे, महागाई दर अपेक्षित लक्ष्याच्या आत आणण्याची निम्मी लढाई अद्याप लढली जायची आहे, असे मत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी जून महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या पतधोरण समितीच्या (एमपीसी) बैठकीत व्यक्त केले आणि समितीतील इतर पाच सदस्यांसह व्याजदरात कोणताही बदल न करण्याच्या बाजूने कौल दिला.
गव्हर्नर दास यांच्या अध्यक्षतेखालील पतधोरण समितीच्या ६ ते ८ जून या कालावधीत झालेल्या बैठकीचे इतिवृत्त गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आले. त्यानुसार, भारताच्या अर्थव्यवस्थेच्या मूलभूत बाबींमध्ये सुदृढता दिसून येत आहे आणि विकासाच्या शक्यताही व्यापक बनण्यासह त्यात सातत्याने सुधार दिसत आहे, असेही दास यांनी मत व्यक्त केले. जूनमधील सलग दुसऱ्यांदा द्विमासिक आढावा बैठकीत रेपो दर एमपीसीने अपरिवर्तित ठेवला.
हेही वाचाः अॅक्सिस बँकेच्या ग्राहकांसाठी खुशखबर, बँकेने सुरू केली नवी सेवा; तुम्हालाही फायदा होणार
महागाई कमी झाली असली तरी, महागाईविरुद्धचा लढा अजून संपलेला नाही. विकसित होत असलेल्या महागाई-वाढीच्या दृष्टिकोनाचे दूरदर्शी मूल्यमापन करणे आवश्यक आहे आणि परिस्थिती उद्भवल्यास कारवाई करण्यास कायम सज्ज राहणे आवश्यक आहे, असा त्यांनी या बैठकीत सावध इशारा दिल्याचे इतिवृत्त सांगते.
हेही वाचाः बँकांच्या ‘या’ स्पेशल एफडीमध्ये ८ टक्क्यांपर्यंत व्याज; कोणत्या योजनेची अंतिम मुदत कधी संपणार?