Amazon Layoffs 2024 : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांमध्ये नोकर कपातीची प्रक्रिया सुरू झाली आहे. गुगल आणि सिटीग्रुपमध्ये नोकर कपातीच्या घोषणेनंतर अ‍ॅमेझॉनसुद्धा मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार आहे. गुरुवारी नोकर कपातीबद्दल अ‍ॅमेझॉन प्राइमने माहिती दिली. ते म्हणाले की, ते आपल्या बाय विथ प्राइम युनिटमधून ५ टक्के कर्मचार्‍यांना काढून टाकणार आहेत. कंपनीने हे युनिट २०२२ मध्ये सुरू केले. हे प्लॅटफॉर्म विशेषतः व्यापार्‍यांना मदत करण्यासाठी आणि लॉजिस्टिक नेटवर्क सुधारण्यासाठी लाँच केले गेले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अ‍ॅमेझॉनने किती कर्मचाऱ्यांना कामावरून काढले जाईल हे स्पष्ट केलेले नाही

या नोकर कपातीची घोषणा करताना अ‍ॅमेझॉनने किती कर्मचाऱ्यांना कामावरून काढले जाईल हे स्पष्ट केलेले नाही. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या वृत्तानुसार, अ‍ॅमेझॉनच्या या निर्णयानंतर युनिटमध्ये काम करणाऱ्या ३० हून अधिक कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा फटका बसणार आहे. अ‍ॅमेझॉनने म्हटले आहे की, कंपनी नोकर कपात केलेल्या कर्मचार्‍यांना दुसर्‍या युनिट किंवा इतर कंपनीत नोकरी मिळवण्यास मदत करणार आहे.

हेही वाचाः बोईंगला पंतप्रधान मोदींच्या ‘मेक इन इंडिया’ची भुरळ, भारतात १६०० कोटींची गुंतवणूक करणार

याआधीही कंपनीने नोकर कपात जाहीर केली

दोन वर्षांपूर्वी सुरू झालेली जागतिक नोकर कपातीची प्रक्रिया २०२४ मध्येही थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. अ‍ॅमेझॉनने अलीकडेच मोठ्या प्रमाणात नोकर कपातीची घोषणा केली आहे, जी त्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म चालवते. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, कंपनी ट्विचमधून सुमारे ३५ टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकणार आहे.

हेही वाचाः टायर बनवणाऱ्या कंपनीची जबरदस्त कामगिरी, कधी काळी ११ रुपये असलेल्या शेअरने गाठला १.५ लाखांचा उच्चांक

गुगलनेही नोकर कपात जाहीर केली

Amazon च्या आधी Google ने देखील मोठ्या प्रमाणात नोकर कपातीची योजना बनवली. कंपनी २०२४ मध्ये हार्डवेअर, कोअर इंजिनीअरिंग आणि गुगल असिस्टंट टीममध्ये मोठ्या प्रमाणात नोकर कपात करीत आहे. याबरोबरच व्हॉईस अ‍ॅक्टिव्हेटेड गुगल असिस्टंट सॉफ्टवेअर टीमच्या कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात येत आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hanging sword of job cuts on companies remains amazon to lay off 5 percent of employees in prime unit vrd