खासगी क्षेत्रातील बँक HDFC बँकेने दोन विशेष कालावधीसाठी FD व्याजदर कमी केले आहेत. ही वजावट ३५ महिने आणि ५५ महिन्यांच्या FD वर करण्यात आली आहे. हे नवे दर १ ऑक्टोबर २०२३ पासून लागू झाले आहेत, जे २ कोटी रुपयांपर्यंतच्या FD साठी आहेत. आतापर्यंत बँक ३५ महिन्यांच्या एफडीवर ७.२० टक्के आणि ५५ महिन्यांच्या एफडीवर ७.२५ टक्के व्याजदर देत होती. आता बँकेने दोन्ही ५ बेसिस पॉइंट्स म्हणजेच ०.०५ टक्के कमी केले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

HDFC बँकेचे FD दर आता काय?

HDFC बँक सध्या ७-२९ दिवसांच्या FD साठी ३ टक्के व्याजदर देत आहे. जर तुम्ही ३०-४५ दिवसांसाठी FD केली तर तुम्हाला ३.५० टक्के व्याज मिळेल. दुसरीकडे तुम्हाला ४६ दिवसांपासून ते ६ महिन्यांपर्यंतच्या FD वर ४.५० टक्के व्याज मिळेल. तुम्ही ६ महिने, १ दिवस ते ९ महिन्यांच्या कालावधीसाठी FD केल्यास तुम्हाला ५.७५ टक्के व्याज मिळेल. जर तुम्ही ९ महिने ते १ वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी FD केली तर तुम्हाला ६ टक्के व्याज मिळू शकते.

हेही वाचाः प्राप्तिकर विभागाने एलआयसीला ८४ कोटींचा ठोठावला दंड, एलआयसी न्यायालयात दाद मागणार

एक वर्ष ते १५ महिन्यांपेक्षा कमी कालावधीत परिपक्व होणाऱ्या एफडींवर बँकेकडून ६.६० टक्के व्याज दिले जात आहे. तर १५ महिने ते १८ महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी बँक ७.१० टक्के व्याज देत आहे. HDFC बँक १८ महिने ते दोन वर्षे आणि ११ महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी ७ टक्के व्याज देत आहे. २ वर्षे ११ महिने ते ४ वर्षे ७ महिन्यांपेक्षा कमी कालावधीवर ७ टक्के व्याज देखील उपलब्ध आहे. याशिवाय बँक ४ वर्षे, ७ महिने, १ दिवस ते १० वर्षांपर्यंतच्या एफडीवर फक्त ७ टक्के व्याज देत आहे. तर ३५ महिन्यांच्या एफडीवर ७.१५ टक्के तर ५५ महिन्यांच्या एफडीवर ७.२० टक्के व्याज दिले जात आहेत.

हेही वाचाः जागतिक बँकेकडून भारताला मोठा धक्का, महागाई वाढण्याचे दिले संकेत

ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त व्याज मिळणार

एचडीएफसी बँक ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त व्याज देत आहे. हे व्याज ३.५० टक्के ते ७.७५ टक्के आहे, जे ७ दिवस ते १० वर्षांच्या कालावधीसाठी आहे. बँक ३५ महिन्यांच्या स्पेशल एडिशन एफडीवर ७.६० टक्के तर ५५ महिन्यांच्या स्पेशल एडिशन एफडीवर ७.७० टक्के व्याज देत आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hdfc bank cuts fd rates effect on what period and how much interest will be received now vrd
Show comments