HDFC Home Loan Rate Hike: एचडीएफसीने बँकेचा रिटेल प्राइम लेंडिंग रेट 0.35 टक्क्यांनी वाढवण्याची घोषणा केली आहे. यामुळे गृहकर्जाचा किमान दर ८.६५ टक्के झाला आहे. नवीन दर २० डिसेंबरपासून लागू झाले आहेत.
एचडीएफसीचा रिटेल प्राइम लोन रेट ०.३५ टक्क्यांनी वाढवून ८.६५ टक्के करण्यात आला आहे. एचडीएफसीने मे महिन्यापासून व्याजदरात २.२५ टक्क्यांनी वाढ केली आहे. कंपनीच्या मते हा इंडस्ट्रीमधील सर्वात कमी रेट आहे. ८.६५ टक्के नवा दर फक्त त्या ग्राहकांसाठी लागू होईल ज्यांचा ‘क्रेडिट स्कोअर’ ८०० किंवा त्याहून अधिक असेल, अशी माहिती एचडीएफसीकडुन देण्यात आली.
६ लाख कोटींचे गृहकर्जासह आघाडीवर असणाऱ्या एसबीआयचा दर ८.७५ आहे, हा दर क्रेडिट स्कोर ७५० किंवा त्याहून अधिक असणाऱ्यांसाठी आहे. हा दर ३१ जानेवारी २०२३ पर्यंतच्या सणांमधील ऑफर्सचा भाग आहे. क्रेडिट स्कोर ८०० पेक्षा जास्त असणाऱ्यांसाठी बँकेचा सामान्य दर ८.९० टक्के आहे.
आयसीआयसी बँकेचा फेस्टिव्ह ऑफर रेट ८.७५ टक्क्यांपासून सुरू होतो, ज्यामध्ये ७५० हून अधिक क्रेडिट स्कोर असावा अशी अट आहे. या विशेष दराचा कालावधी ३१ डिसेंबरला संपेल. बँकेचा सामान्य दर ८.९५ टक्के आहे.