मुंबई: खासगी क्षेत्रातील आघाडीच्या एचडीएफसी बँकेने विविध कालावधीच्या निधीवर आधारित कर्ज व्याजदरात (एमसीएलआर) ५ ते १५ आधारबिंदू वाढीची घोषणा केली. नवीन दरवाढ सोमवारपासूनच (८ मे) लागू झाली आहे. यातून, बँकेच्या गृह, वाहन, वैयक्तिक अशा सर्व ग्राहक कर्जदारांवरील हप्त्यांचा भार वाढणार आहे.

सर्वसाधारणपणे ‘एमसीएलआर’चे दर एक ते तीन वर्षांसाठी निश्चित करण्यात आलेले असतात. ‘एमसीएलआर’वर आधारित एक वर्ष मुदतीच्या कर्जावरील एचडीएफसी बँकेचे व्याजदर ९.०५ टक्क्यांवर गेले आहेत. याचप्रमाणे एका दिवसासाठी ७.९५ टक्के, तर तीन महिने आणि सहा महिने कालावधीच्या कर्जावरील व्याजदर अनुक्रमे ८.४० टक्के आणि ८.८० टक्के झाला आहे. तसेच तीन वर्षे मुदतीच्या कर्जासाठी दर आता ९.२० टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आले आहेत.

Ramesh Chennithala Nana Patole
Congress : बंडखोरांविरोधात काँग्रेस अ‍ॅक्शन मोडवर, मतदानाच्या १० दिवस आधी १६ जण निलंबित
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Mission on Oilseeds in Crisis due to gm soybeans
जीएम सोयाबीन विना तेलबिया मिशन संकटात
maharashtra assembly election 2024 uddhav thackeray hoarding
‘प्रकल्प रोखणारे सरकार’ला ठाकरे गटाचे फलकबाजीतून उत्तर
semiconductor technology to china
चिप-चरित्र: चिनी धोरणसातत्याची फळे!
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
Sagar Meghes pointed speech front of nitin gadkari is getting discuss
‘तीनदा पराभव, डॉक्टर अन् राजकारणाचा किडा…’ सागर मेघे यांच्या टोकदार भाषणाची गावभर चर्चा…
rbi digital awareness loksatta
जनजागृतीवर ५९ कोटींचा खर्च, तरीही सर्वसामान्यांच्या २,८८० कोटींवर डल्ला…बँकेत तुमचे पैसे…

आणखी वाचा- डिझेल चारचाकींवर २०२७ पर्यंत बंदी?

महागाईवर नियंत्रणासाठी रिझर्व्ह बँकेने मे महिन्यापासून रेपो दरात २.५ टक्क्यांची वाढ केली असून तो आता ६.५० टक्क्यांवर पोहोचला आहे. परिणामी, कर्जदारांच्या हप्त्यांमध्ये मे २०२२ पासून लक्षणीय वाढ झाली आहे, बँका सतत कर्जदरात वाढ करत असल्याने त्यात आणखी वाढ होण्याची भीती आहे.