गृहनिर्माण वित्त कंपनी एचडीएफसी लिमिटेडने त्यांच्या शैक्षणिक कर्ज शाखा एचडीएफसी क्रेडिला फायनान्शियल सर्व्हिसेसमधील ९० टक्के भागभांडवल खासगी इक्विटी कंपन्यांच्या गटाला ९,०६० कोटी रुपयांना विकले आहे. एचडीएफसी क्रेडिलाची विक्री एचडीएफसी लिमिटेड आणि कंपनीची प्रवर्तक कंपनी एचडीएफसी बँक यांच्या विलीनीकरणापूर्वी करण्यात आली आहे. देशातील दोन्ही मोठ्या वित्तीय कंपन्यांचे विलीनीकरण या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत होणार आहे.
तिन्ही कंपन्यांकडून एक निवेदन जारी
एचडीएफसी लिमिटेड, एचडीएफसी बँक लिमिटेड आणि एचडीएफसी क्रेडिला फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड यांच्या वतीने एक संयुक्त निवेदन जारी करण्यात आलेय. कंपनीने एचडीएफसी क्रेडिलामधील हिस्सेदारी विकण्यासाठी गुंतवणूकदारांच्या गटाशी करार केला आहे आणि या गुंतवणूकदारांमध्ये बीपीईए ईक्यूटी आणि क्रिस कॅपिटल यांसारख्या कंपन्यांचा समावेश आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षात HDFC क्रेडिलाचे उत्पन्न १,३५२.१८ कोटी रुपये होते, तर ३१ मार्च २०२३ पर्यंत कंपनीचे उत्पन्न २,४३५.०९ कोटी रुपये होते. कंपनीने आतापर्यंत १.२४ लाख ग्राहकांना कर्ज वितरित केले आहे आणि १५,००० कोटी रुपयांचे कर्ज बुक आहे.
हेही वाचाः सेबीची IIFL सिक्युरिटीजवर कडक कारवाई, शेअर्स १९ टक्क्यांपेक्षा जास्त घसरले
कंपनीच्या वतीने एचडीएफसी क्रेडिलामध्ये ९.९९ टक्के स्टेक ठेवला जाईल. ही कंपनी विद्यार्थ्यांना भारतात आणि परदेशातील शिक्षणासाठी कर्ज देते. एचडीएफसीचे सीईओ केकी मिस्त्री म्हणाले, “आम्हाला विश्वास आहे की, कंपनी खूप चांगल्या स्थितीत आहे आणि नवीन भागधारक आल्यावर कंपनीची वाढ कायम राहील.”
हेही वाचाः पीएम नरेंद्र मोदींचा अमेरिका दौरा, २० हून अधिक अमेरिकन कंपन्यांना भेटणार; भारताला ‘हा’ फायदा होणार
कंपनीचे लक्ष डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनवर असेल
HDFC क्रेडिला गुंतवणूक करत राहील आणि डिजिटल परिवर्तनाला गती देईल, असंही BPEA EQT इंडियाचे भागीदार आणि प्रमुख जिमी महतानी यांनी सांगितले.