वृत्तसंस्था, नवी दिल्ली
केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाने हिरो इलेक्ट्रिक आणि बेनलिंग इंडिया या कंपन्यांना ‘फेम-२’ योजनेतून वगळण्याचा निर्णय घेतल्याचे बुधवारी सूत्रांनी स्पष्ट केले. यामुळे या कंपन्यांना भविष्यात सरकारकडून या योजनेत दिल्या जाणाऱ्या कोणत्याही योजनेतील सवलती मिळणार नाहीत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

विद्युत शक्तीवरील अर्थात इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी ‘फास्टर ॲडॉप्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ इलेक्ट्रिक व्हेईकल्स इन इंडिया’ (फेम) योजना राबविली जाते. यात कंपन्यांना विद्युत वाहनांच्या (ईव्ही) निर्मितीवर अनुदान दिले जाते. या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात ‘फेम-२’ मध्ये हिरो इलेक्ट्रिक आणि बेनलिंग इंडिया यांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे केंद्रीय अवजड मंत्रालयाने या दोन्ही कंपन्यांना ‘फेम-२’ मधून वगळले आहे. ही कारवाई दोन वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आली आहे.

हेही वाचा >>>खासगी क्षेत्रातून गुंतवणूक-चक्राला लवकरच चालना; अर्थतज्ज्ञांचे अनुमान

‘फेम-२’ योजनेतील नियमांच्या उल्लंघनाच्या अनेक तक्रारी मंत्रालयाकडे आल्या होत्या. या योजनेचा फायदा घेण्यासाठी ईव्ही निर्मिती कंपन्यांनी देशांतर्गत उत्पादित सुट्या भागांचा वापर जास्तीतजास्त करण्याचे बंधन आहे. मात्र, या कंपन्या परदेशातून सुटे भाग आयात करून त्यांचा वापर मोठ्या प्रमाणात करीत होत्या. अशा प्रकारे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १३ कंपन्या आढळल्या होत्या. त्यातील सहा कंपन्यांना दंड करण्यात आला होता. यातील काही कंपन्यांनी अनुदानाची रक्कम व्याजासह परत केली होती. मात्र, काही कंपन्यांनी ही रक्कम परत केली नव्हती. त्यातील हिरो इलेक्ट्रिक आणि बेनलिंग इंडिया या दोन कंपन्यांना आता ‘फेम-२’ योजनेतून वगळण्याचाच निर्णय घेतला गेला आहे.