शॉर्ट सेलर हिंडेनबर्ग रिसर्चने अदाणी ग्रुपच्या कंपनीवर केलेले आरोप पूर्णपणे निराधार असल्याचं सिद्ध झाले आहे. अमेरिकन सरकारच्या तपास यंत्रणेने आपल्या तपासानंतर हे सांगितले असून, अदाणी समूहाला क्लीन चिट दिली आहे. ब्लूमबर्गने यासंदर्भात बातमी दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तपासात हिंडेनबर्गचे आरोप खरे आढळले नाहीत

अमेरिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, अमेरिकन सरकारच्या तपासणीत हिंडेनबर्ग रिसर्चच्या गौतम अदाणी यांच्यावरील कॉर्पोरेट फसवणुकीचे आरोप खरे ठरलेले नाहीत. नाव न सांगण्याच्या अटीवर डीएफसीच्या एका अधिकाऱ्याने ब्लूमबर्गला सांगितले की, अदाणी समूह कॉर्पोरेट इतिहासातील सर्वात मोठी फसवणूक करत असल्याचा हिंडेनबर्गचा आरोप निराधार असल्याचे अदाणी पोर्ट्स अँड कंपनीने स्पष्ट केल्याने डीएफसी समाधानी आहे. अदाणी पोर्ट्स आणि एसईझेड ही श्रीलंकेतील प्रकल्पाचे नेतृत्व करणारी उपकंपनी आहे.

हेही वाचाः Money Mantra : कर्जाची परतफेड करू न शकणाऱ्यांसाठी आरबीआयचा ‘हा’ नियम ठरणार फायदेशीर

श्रीलंका प्रकल्प विशेष का आहे?

अमेरिकन सरकार कधीच आर्थिक अनियमितता किंवा कोणत्याही गैरव्यवहारांना समर्थन देत नाही, याची खात्री करण्यासाठी अमेरिकन एजन्सी भारतीय कंपनीवर देखरेख ठेवत राहील, असंही नाव न सांगण्याच्या अटीवर अधिकाऱ्यानं सांगितलं. तसेच अमेरिका पायाभूत सुविधा प्रकल्पांना चीनपेक्षा वेगळ्या पद्धतीने हाताळते. जगभरात पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांवर चीन ज्या आक्रमकतेने काम करीत आहे, विशेषत: राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या बेल्ट अँड रोड प्रकल्पावर ते ज्या गतीनं काम रेटत आहेत, अमेरिका अनेक वर्षांपासून चीनच्या या प्रयत्नांना उत्तर शोधत होती, त्यानंतर श्रीलंका बंदर प्रकल्प सुरू झाला. त्यामुळेच अमेरिका आता अदाणींना श्रीलंका बंदर प्रकल्पासाठी मदत करीत आहे. श्रीलंकेतील प्रकल्पासाठी अदाणी समूहाला अमेरिकन सरकारने ५५३ मिलियन डॉलरचे कर्ज दिले आहे.

हेही वाचाः गौतम अदाणी यांनी एका दिवसात ५.६ अब्ज डॉलर्सची केली कमाई, निवडणुकीच्या निकालांमुळे शेअर बाजारात विक्रमी वाढ

अदाणी समूहाच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ

या बातमीनंतर अदाणी ग्रुपच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ झाली असून, इंट्राडेमध्ये अदाणी ग्रुपच्या शेअर्सचे बाजारमूल्य १२,८७,६६० कोटी रुपयांवर पोहोचले आहे. इंट्राडेमध्ये बाजारमूल्य ९२,११९ कोटी रुपयांनी वाढले आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hindenburg allegations baseless us govt gives clean chit to adani for sri lanka big project read in detail vrd
Show comments