SP Hinduja Passed Away : हिंदुजा बंधूंमधील ज्येष्ठ आणि हिंदुजा समूहाचे अध्यक्ष एसपी हिंदुजा यांचे ८७ व्या वर्षी लंडनमध्ये निधन झाले. हिंदुजा कुटुंबीयांच्या प्रवक्त्याने बुधवारी ही माहिती दिली. एसपी हिंदुजा हे काही दिवसांपासून प्रकृतीमुळे अस्वस्थ होते. गोपीचंद, प्रकाश, अशोक आणि संपूर्ण हिंदुजा कुटुंबीय आज आमच्या कुटुंबाचे कुलगुरू आणि हिंदुजा समूहाचे अध्यक्ष एसपी हिंदुजा यांच्या निधनाची घोषणा करताना अत्यंत दु:खी झाले आहे. ते कुटुंबाचे गुरू होते. त्यांनी यूके आणि भारत यांच्यात मजबूत संबंध निर्माण करण्यात आपल्या भावांबरोबर महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, अशी भावना हिंदुजा कुटुंबीयांच्या प्रवक्त्याने व्यक्त केली.
समूहाची मालमत्ता १४०० कोटी रुपये आहे
देशात ट्रक बनवण्याच्या व्यवसायाव्यतिरिक्त हिंदुजा समूह बँकिंग, रसायने, ऊर्जा, मीडिया आणि आरोग्य क्षेत्रातही सक्रिय आहे. ग्रुप कंपन्यांमध्ये ऑटो कंपनी अशोक लेलँड आणि इंडसइंड यांसारख्या मोठ्या ब्रँडचा समावेश आहे. हिंदुजा बंधू चार भाऊ आहेत. समूहाची मालमत्ता १४ अब्ज डॉलर (१४०० कोटी) आहे.
हिंदुजा ग्रुपची स्थापना १९१४ मध्ये झाली
हिंदुजा ग्रुपची स्थापना १९१४ मध्ये श्रीचंद परमानंद यांनी केली होती. हिंदुजा समूहाचा व्यवसाय जगातील ३८ देशांमध्ये पसरला असून, कंपनीमध्ये सुमारे १.५ लाख कर्मचारी काम करतात. श्रीचंद परमानंद यांना चार पुत्र आहेत.
हेही वाचाः LIC चे शेअर बाजारात आल्यानंतर एका वर्षात गुंतवणूकदारांना २.५ लाख कोटींचा फटका, जाणून घ्या
पाकिस्तानमध्ये जन्म झाला
श्रीचंद पी हिंदुजा हे एसपी म्हणूनही ओळखले जातात. हिंदुजा ग्रुपचे संस्थापक पीडी हिंदुजा यांचे ते ज्येष्ठ पुत्र होते. त्यांचा जन्म १९३५ मध्ये कराची (पाकिस्तान) येथे झाला. १९५२ मध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते १८ व्या वर्षी वडिलांच्या व्यवसायात रुजू झाले. नंतर त्यांनी ब्रिटिश नागरिकत्व घेतले आणि लंडनमध्ये राहू लागले. नुकतेच निधन झालेल्या मधु हिंदुजा यांच्याशी त्यांचे लग्न झाले होते. त्यांना शानू आणि वीणू या दोन मुली आहेत. त्यांना जीपी हिंदुजा, प्रकाश हिंदुजा आणि अशोक हिंदुजा असे तीन भाऊ आहेत.
हेही वाचाः इन्स्टाग्रामवर रील्स बनवून देतायत गुंतवणुकीचे सल्ले, फिनफ्लुएन्सर अशा प्रकारे करतात लाखोंची कमाई
बोफोर्स घोटाळ्यात नाव पुढे आले
१८ व्या वर्षापासून व्यवसायात असलेले एसपी हिंदुजा यांचे ८०च्या दशकात बोफोर्स घोटाळ्यात नाव आले होते. बोफोर्स घोटाळ्यात हिंदुजा बंधूंना गांधी घराण्याशी असलेल्या जवळिकीचा मोठा फायदा झाल्याचा आरोप करण्यात आला होता. गांधी घराण्याशी जवळीक असल्यामुळे बोफोर्स करार स्वीडिश कंपनीच्या नावे करून घेण्याचे कामही त्यांना देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता.