पुणे : ब्लॅकस्टोन रिअल इस्टेट फंडांच्या मालकीच्या होरायझन इंडस्ट्रियल पार्क्सने पुण्यातील चाकणमध्ये औद्योगिक आणि लॉजिस्टिक पार्क उभारणीसाठी एक हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. हा पार्क कार्यान्वित झाल्यानंतर त्यातून सुमारे ४,००० रोजगार निर्मिती होणे अपेक्षित आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

चाकणमधील हा नियोजित पार्क १०० एकरवर विस्तारलेला असणार आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाद्वारे मुंबई व पुण्याशी जोडलेले असल्याने चाकण हे औद्योगिक आणि लॉजिस्टिक पार्कसाठी योग्य ठिकाण बनले आहे. या आधी कंपनीने चाकणमध्ये ५२ एकरवर औद्योगिक व लॉजिस्टिक पार्क उभारला आहे. त्यात विविध क्षेत्रांतील कंपन्या सध्या कार्यरत आहेत.

हेही वाचा >>>व्होडा-आयडियाच्या उलाढालीचा विक्रम; १,००० कोटी समभागांचे व्यवहार

याबाबत ब्लॅकस्टोनचे उर्विश रांभिया म्हणाले की, चाकणमधील आणखी एका पार्कचे भूमिपूजन झाले आहे. मोक्याच्या ठिकाणी उच्च दर्जाची लॉजिस्टिक मालमत्ता विकसित करण्याचा आमचा उद्देश आहे. ई-कॉमर्सचा वापर वाढल्याने आणि औद्योगिक वाढीमुळे भारतात आधुनिक गोदाम सुविधेला मोठी मागणी आहे. होरायझन इंडस्ट्रियल पार्क्सचे (तिच्या संलग्न कंपन्यांसह) देशभरात १,७०० एकरपेक्षा जास्त क्षेत्रफळावर एकूण २४ औद्योगिक व लॉजिस्टिक पार्क कार्यरत आहेत.