नवरात्र, दसरा, दिवाळी या सणांच्या मुहूर्तावर गृहनिर्माण प्रकल्पांची घोषणा अन् सुरुवात करता यावी, यासाठी महारेराकडे आपले अर्ज सर्व विहित कागदपत्रांसह आणि वेळेत सादर करा, असे आवाहन महारेराने विकासकांच्या स्वंयंविनियामक संस्थांना विशेष पत्र लिहून केले आहे. सर्व विकासक आणि प्रवर्तकांसाठी हे पत्र महारेराच्या संकेतस्थळावरही टाकण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचाः अदाणी समूहावर आता फायनान्शिअल टाइम्सनेही केले गंभीर आरोप; गौतम अदाणी म्हणाले, ”वैयक्तिक स्वार्थासाठी समूहाचे…”

नवरात्र, दसरा, दिवाळी या सणांच्या मुहूर्तावर अनेक विकासक/प्रवर्तक आपल्या नवीन गृहनिर्माण प्रकल्पांची घोषणा अन् सुरुवात करीत असतात. अर्थात यासाठी त्यांना महारेरा नोंदणीक्रमांक असल्याशिवाय प्रकल्पाची जाहिरात, नोंदणी, विक्री करता येत नाही. म्हणून नोंदणीक्रमांक लवकरात लवकर मिळावा असा ते आग्रह धरतात.

हेही वाचाः एलॉन मस्कच्या संपत्तीबरोबरच मुकेश अंबानींची संपत्ती वाढली, जाणून घ्या जगातील टॉप १० अब्जाधीश कोण?

नोंदणीक्रमांक देण्याची महारेराची सुनिश्चित कार्यपद्धती आहे. विकासकांच्या स्वंयंविनियामक संस्थांच्यामुळे ती सर्वांना माहितही आहे. यात महारेरा ग्राहकहित डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक प्रस्तावाची आर्थिक, कायदेविषयक आणि तांत्रिक छाननी काटेकोरपणे करते. या विकासकांना लवकरात लवकर नोंदणीक्रमांक मिळावेत, यासाठी महारेरा प्रयत्नशील आहे. परंतु अपेक्षित कागदपत्रे सादर न केल्यास, त्रुटींची पूर्तता न झाल्यास यात अडचणी येऊ शकतात. याची जाणीव ठेवून विकासकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही महारेराने केले आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Housing projects are starting on the occasion of navratri dussehra and diwali then read this news vrd
Show comments