August 2023 Bank Holiday List : आपल्या जीवनात बँक हा महत्त्वाचा भाग आहे. अनेकदा आपल्याला खात्यातून पैसे काढण्यासाठी किंवा पैसे जमा करण्यासाठी किंवा जुन्या नोटा बदलण्यासाठी बँकेत जावे लागते. ऑगस्ट महिन्यात बँकेशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम असल्यास या महिन्याची बँकेच्या सुट्ट्यांची यादी तपासा आणि त्यानुसार घराबाहेर पडा. बँकेने जाहीर केलेल्या यादीनुसार, ऑगस्ट २०२३ मध्ये एकूण १४ दिवस बँका बंद राहतील. परंतु ऑगस्ट महिन्यात १४ दिवस बँका बंद असल्या तरी अनेक राज्यांमध्ये या सुट्ट्या वेगवेगळ्या दिवशी असतात.

बँका १४ दिवस बंद राहणार

ऑगस्ट महिन्यात रिझर्व्ह बँकेने बँकांना १४ दिवसांची सुट्टी जाहीर केली आहे. म्हणजेच ऑगस्टमध्ये सण, जयंती आणि शनिवार-रविवार यामुळे एकूण १४ दिवस बँका बंद राहणार आहेत. १५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिनानिमित्त संपूर्ण देशात बँका बंद राहणार आहेत, याशिवाय ओणम, रक्षाबंधनामुळे देशातील अनेक भागात बँका बंद राहणार आहेत.

Surya transit in kumbh
पुढील २८ दिवसानंतर सूर्य करणार मालामाल; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार पद, प्रतिष्ठा अन् पैसाच पैसा
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
ulta chashma
उलटा चष्मा : शीर्षस्थांना खूश करण्याच्या नादात…
Amazon Flipkart announce Republic Day sale 2025
ॲमेझॉन, फ्लिपकार्टचा ‘Republic Day sale’ कधी होणार सुरू? काय असणार ऑफर्स; जाणून घ्या एका क्लिकवर
Surya enter in makar rashi
चार दिवसानंतर सूर्य देणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशींना मिळणार नवी नोकरी आणि संपत्तीचे सुख
Weekly Lucky Zodiac Sign 13 To 19 January 2025
Weekly Lucky Zodiac Sign 13 To 19 January 2025: बुध आणि शुक्र बदलणार राशी! ‘या’ चार राशी ठरतील भाग्यशाली, अचानक होईल धनलाभ
Makar Sankranti 2025 Puja Time and Significance in Marathi
Makar Sankranti 2025: १४ जानेवारी रोजी साजरी केली जाणार मकर संक्रांत; जाणून घ्या संक्रांतीचा पुण्य काळ, तिथी आणि महत्त्व
Shani Pluto Ardhakedra yog
२२ जानेवारीपासून शनी घेऊन येणार गडगंज श्रीमंती; अर्धकेंद्र योग ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे नशीब बदलणार

हेही वाचाः १ ऑगस्टपासून ‘हे’ ४ नियम बदलणार, तुमच्या खिशावर परिणाम होणार

रिझर्व्ह बँकेने बँकांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली

६ ऑगस्ट – रविवारी देशभरात बँकांना सुट्टी असेल.
८ ऑगस्ट – रम फाटच्या कारणास्तव गंगटोकमधील तेंडोंग लो येथे बँकांना सुट्टी दिली जाणार आहे.
१२ ऑगस्ट – देशात दुसऱ्या शनिवारी बँकेला सुट्टी आहे.
१३ ऑगस्ट – रविवारी देशभरातील बँका बंद राहणार आहेत.
१५ ऑगस्ट – स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभरात बँकांना सुट्टी असेल.
१६ ऑगस्ट – पारशी नववर्षानिमित्त मुंबई, नागपूर आणि बेलापूरला बँकांना सुट्टी असेल.

हेही वाचाः Money Mantra : येस बँकेच्या ग्राहकांना आता क्रेडिट कार्डाद्वारे UPI पेमेंट करता येणार, क्रेडिट फ्री पीरियड फीचरचा लाभही मिळणार

१८ ऑगस्ट – श्रीमंत शंकरदेव तिथीनिमित्त गुवाहाटीमध्ये बँक बंद राहतील.
२० ऑगस्ट – रविवारी देशभरातील बँका बंद.
२६ ऑगस्ट – चौथ्या शनिवारी देशभरातील बँका बंद राहणार.
२७ ऑगस्ट – रविवारी देशभरातील बँकांना सुट्टी आहे.
२८ ऑगस्ट – ओणमसाठी कोची आणि तिरुवनंतपुरममध्ये बँकेला सुट्टी मिळणार.
२९ ऑगस्ट – तिरुओनममुळे कोची आणि तिरुअनंतपुरममध्ये बँका बंद.
३० ऑगस्ट – रक्षाबंधनामुळे जयपूर आणि शिमल्यात बँकेला सुट्टी असणार.
३१ ऑगस्ट – डेहराडून, गंगटोक, कानपूर, कोची, लखनौ आणि तिरुअनंतपुरममध्ये रक्षाबंधन/श्री नारायण गुरु जयंती/पंग-लाहबसोलमुळे बँकांना सुट्टी असणार.

Story img Loader