गेल्या काही दिवसांपासून समाजात बऱ्याच लोकांना कामाची उत्पादकता आणि विस्तारित कामाच्या तासांचे फायदे या विषयात रस असल्याचं पाहायला मिळत आहे. इन्फोसिसचे सह संस्थापक नारायण मूर्ती यांनी नुकत्याच केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादालाच तोंड फुटलं आहे. मूर्ती यांनी भारतातील तरुणांनी आठवड्यातून ७० तास काम करण्याची सूचना केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता आंतरराष्ट्रीय कामगार संघटने (ILO) चा अहवाल समोर आला आहे.
आंतरराष्ट्रीय कामगार संघटने(ILO) च्या आकडेवारीनुसार, भारतीय आधीच जगातील सर्वात कठीण काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकीच एक आहेत. भारतीय दर आठवड्याला सरासरी ४७.७ तास काम करतात. खरं तर आकडेवारीची तुलना केल्यास जगातील दहा प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा सर्वात मोठा सरासरी वर्क आठवडा असल्याचं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.
हेही वाचाः मुंबईत मिळतात सर्वात महागडी घरे, किमती वाढण्याच्या बाबतीत जगातील टॉप ५ शहरांमध्ये समावेश
जागतिक स्तरावर भारत सातव्या क्रमांकावर आहे. कतार, काँगो, लेसोथो, भूतान, गांबिया आणि संयुक्त अरब अमिराती यासह काही देशांनी त्याला मागे टाकले आहे. त्याच पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय कामगार संघटना आता भारतात कामाच्या तासांबाबत अहवाल तयार करण्याचा विचार करीत आहे. पहिल्या दहा जागतिक अर्थव्यवस्थांमध्ये भारतात रोजगाराचे सर्वाधिक साप्ताहिक कामाचे तास असले तरी दरडोई जीडीपी सर्वात कमी आहे. दुसरीकडे या अर्थव्यवस्थांमध्ये फ्रान्समध्ये दरडोई जीडीपीची सर्वात मोठी आकडेवारी आहे, ज्यामध्ये सर्वात कमी कामकाजाचा आठवडा ३०.१ तास आहे.
हेही वाचाः जगातील कोणताही देश ‘या’ बाबतीत भारताची बरोबरी करू शकणार नाही
मा फोई स्ट्रॅटेजिक कन्सल्टंट्सचे कार्यकारी अध्यक्ष आणि एचआर तज्ज्ञ के पंडियाराजन यांनी कामांच्या आठवड्यात समतोल राखण्याकडे कल दिला आहे. त्यांनी भारताला ३५ तासांच्या कामाच्या आठवड्याच्या पाश्चात्य मॉडेलची कॉपी न करण्याचा सल्ला दिला. त्याऐवजी ते कर्मचार्यांचे आरोग्य आणि फिटनेस लक्षात घेऊन आठवड्यातून ४८ तास काम करून आनंदी माध्यम स्थापन करावे. भारताने आपल्या कामगारांच्या कल्याणाला प्रथम स्थान देताना आपली आर्थिक स्पर्धात्मकता सुधारण्याची योजना कशी आखता येईल, याकडे लक्ष दिलं पाहिजे.