Swiss Bank Account Opening : स्विस बँक ही जगातील एकमेव बँक आहे जिथे भ्रष्ट राजकारणी, अधिकारी आणि व्यापारी आपला काळा पैसा लपवतात. स्विस बँक ही भ्रष्ट आणि अप्रामाणिक लोकांच्या पैशासाठी एक अतिशय सुरक्षित लॉकर आहे, जिथे इतर कोणालाही हस्तक्षेप करता येत नाही. विशेष म्हणजे स्विस बँक आपल्या विचित्र खाते क्रमांकासाठीही प्रसिद्ध आहे. खरं तर स्विस बँकेच्या पासबुकवर खाते उघडणाऱ्या व्यक्तीचे नाव लिहिलेले नसून त्याऐवजी क्रमांक दिला जातो. त्यामुळेच स्विस बँक खातेदाराची ओळख गुप्त ठेवते. १९३४ च्या स्विस बँकिंग कायद्याने स्विस बँकेने खातेधारकाचे नाव उघड करणे कायद्याने गुन्हा आहे.

श्रीमंत देशापासून गरीब देशातील भ्रष्ट लोकांचा पैसा स्विस बँकेत जमा असल्याचं बोललं जातं. श्रीमंत लोक त्यांच्या सरकारला कर भरू नये म्हणून स्विस बँकांमध्ये पैसे जमा करतात, तर भ्रष्ट अधिकारी आणि राजकारणी घोटाळ्यांपासून काळा पैसा लपवण्यासाठी स्विस बँकांमध्ये खाती उघडतात, जेणेकरून सरकारची नजर त्या पैशावर पडू नये. भारतासारख्या गरीब देशातीलही अनेकांचे लाखो कोटी रुपये स्विस बँकेत जमा आहेत, ते परत आणण्याची मागणी वेळोवेळी केली जाते.

milind kale appointed as chairman of the board of management of cosmos bank
कॉसमॉस बँकेच्या व्यवस्थापन मंडळाच्या अध्यक्षपदी मिलिंद काळे
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
ISKCON temple kharghar history
नवी मुंबईतील इस्कॉन मंदिराचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन… इस्कॉनचा इतिहास काय? ही संस्था कशी चालविली जाते?
Bank Of Baroda Specialist Officer Recruitment 2025: Registration Window To Close Soon, Salary Up To Rs 1.35 Lakh
Bank Job: बँकेत नोकरीची संधी! बँक ऑफ बडोदामध्ये बंपर भरती; १.३५ लाखापर्यंत मिळणार पगार; कसा अर्ज कराल जाणून घ्या
Jumped Deposit Scam
बॅलेन्स चेक करताना बँक खातंच रिकामं; काय आहे नवीन ‘Jumped Deposit Scam’?
sbi education loan Study abroad
परदेशात शिक्षण घ्यायचे; पण पैशांची अडचण येतेय? मग SBI च्या शैक्षणिक कर्जाचा ‘हा’ पर्याय एकदा घ्या जाणून
Fund Jigyaza Wealth Creation Through SIP
फंड जिज्ञासा – ‘एसआयपी’च्या माध्यमातून संपत्ती निर्मिती
Portfolio With Alpha
अल्फा पोर्टफोलिओ कसा तयार करायचा?

तुम्ही घरबसल्या स्विस बँकेत खाते उघडू शकता

स्विस बँक स्वित्झर्लंडमध्ये आहे. पण आपण ज्या स्विस बँकेबद्दल बोलत आहोत ती प्रत्यक्षात UBS आहे, जी जगभरात “स्विस बँक” म्हणून ओळखली जाते. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खाते उघडण्यापेक्षाही स्विस बँकेत खाते उघडणे खूप सोपे आहे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही स्विस बँकेत घरी बसून खाते उघडू शकता. स्विस बँकेसारख्या मोठ्या बँकादेखील तुम्हाला ईमेलद्वारे खाते उघडण्याची परवानगी देतात. इंटरनेटवर असे अनेक प्लॅटफॉर्म आहेत, जे तुम्हाला स्विस बँक खाते उघडण्यास मदत करू शकतात. स्विस बँक खाते उघडण्यासाठी स्वित्झर्लंडचे अनिवासी किमान १८ वर्षे वयाचे असले पाहिजेत, अशी अट आहे. विशेष म्हणजे खातेदार त्यांचे चलनही निवडू शकतात, बहुतेक जण ते स्विस फ्रँक, यूएस डॉलर, युरो किंवा ब्रिटिश पाउंड स्टर्लिंगमध्ये पैसे ठेवण्याचे निवडतात.

किमान बॅलन्स असणे आवश्यक

UBS च्या वेबसाइटनुसार, त्याचा किमान बॅलन्स सुमारे १ लाख डॉलर किंवा ७५ लाख रुपये पाहिजे. खात्यावर ३०० डॉलर किंवा सुमारे २२ हजार रुपये देखभाल शुल्कदेखील आकारले जाते. म्हणजे खाते सुरू ठेवण्यासाठी तुम्हाला ३०० डॉलर भरावे लागणारे आहे,तेसुद्धा व्याजाशिवाय. जसे आपण लॉकरसाठी पैसे देतो.

स्विस बँकेत खाते उघडण्यासाठी या कागदपत्रांची आवश्यकता असेल

१. पासपोर्ट: (पासपोर्टची प्रत खूप महत्त्वाची असेल)

२. तुमच्या मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे (म्हणजे तुमच्याकडे किती पैसे आहेत, तुमची किती मालमत्ता आहे.)

३. उत्पन्नाचा स्रोत: (तुमच्याकडे किती ठेव आहे हे देखील तुम्हाला सांगावे लागेल)

Story img Loader