Rajasthan CM : राजस्थानच्या नवीन मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. राज्याची कमान आता भजनलाल शर्मा यांच्या हाती भाजपनं सोपवली आहे. भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत भजनलाल शर्मा यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली आहे. राजस्थानमध्ये भाजपच्या दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या वसुंधरा राजे आणि त्यांच्यात चढाओढ होती, पण शेवटी त्यांच्या नावाला मंजुरी मिळाली. मात्र, संपत्तीच्या बाबतीत ते अजूनही वसुंधरा यांच्या मागे आहेत.

बँकेत जमा रक्कम किती आहे?

भजनलाल शर्मा यांनी बँका, वित्तीय संस्था आणि नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्यांमध्ये जमा केलेल्या रकमेबद्दल बोलायचे झाल्यास त्यांच्याकडे एचडीएफसी बँकेच्या खात्यात १ लाख ४७ हजार १७३ रुपये जमा आहेत. पीएनबी बँक भरतपूरच्या खात्यात २०७५ रुपये, बीओबी बँक भरतपूर खात्यात १३,०२७ रुपये, BOB बँक भरतपूरच्या खात्यात ५२४६ रुपये, SBI बँक भरतपूरच्या खात्यात ७ लाख ३१ हजार ५७९ रुपये, HDFC बँक भरतपूरच्या खात्यात २ लाख २१ हजार ५०० रुपये आणि HDFC बँक जयपूरमध्ये २१,००० रुपये जमा आहेत. त्यांच्याकडे त्यांच्या मुलाच्या शिक्षणासाठी घेतलेले १६.५३ लाख रुपयांचे शैक्षणिक कर्ज अद्यापही थकीत आहे.

government banks earned net profit
सरकारी बँकांना सहामाहीत ८६ हजार कोटींचा निव्वळ नफा
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
public sector banks npa marathi news
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे ‘एनपीए’ ३.१६ लाख कोटींवर
jan dhan account marathi news
अकरा कोटी निष्क्रिय जनधन खात्यांमध्ये १४,७५० कोटी पडून
sunk deposits loksatta news
विश्लेषण : बुडालेल्या ठेवी परत मिळू शकतात? शासनाचे नवे परिपत्रक काय?
high expectations from third quarter
तिसऱ्या तिमाहीकडून अपेक्षांचे ओझे !
rbi cuts growth forecast to 6 6 percent
विकास दराचा अंदाज कमी; रिझर्व्ह बँकेकडून चालू आर्थिक वर्षासाठी ६.६ टक्क्यांचे अनुमान
bitcoin price review bitcoin prices got a boost reaches 100000 usd
विश्लेषण : ‘बिटकॉइन’ पोहोचले १ लाख डॉलरवर… का आणि कसे? भारतात मान्यता मिळेल?

हेही वाचाः लॉटरी वितरकांकडून जीएसटी चुकवेगिरीच्या १२ प्रकरणांमध्ये ३४४.५७ कोटी जप्त अन् ६२१.५६ कोटींची वसुली

पत्नीच्या नावावर किती रक्कम जमा?

बँका, वित्तीय संस्था आणि बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांमध्ये जमा केलेल्या रकमेबद्दल बोलायचे झाल्यास भजनलाल शर्मा यांच्या पत्नीने बडोदा राजस्थान ग्रामीण बँकेतील भरतपूरच्या खात्यात जमा केलेले पैसे १० हजार ४८१ रुपये जमा आहेत.

हेही वाचाः …म्हणून अभ्युदय सहकारी बँकेवर संकट ओढावले, बुडीत कर्जे वर्षभरात तीन पटीने वाढली

या कंपन्यांचे बाँड, डिबेंचर्स आणि कंपन्यांमध्ये शेअर्स

राजस्थानचे नवे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या गुंतवणुकीवर नजर टाकल्यास त्यांनी HDFC Life Pro Growth Plus मध्ये १ लाख ९४,८०० रुपये गुंतवले आहेत.

पत्नीच्या नावावर मोठी गुंतवणूक

भजनलाल शर्मा यांच्या पत्नीच्या नावावर एकच एलआयसी पॉलिसी आहे, ज्यात त्यांनी ७२,८३६ रुपये गुंतवले आहेत. राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्याकडे १ लाख ८० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आहेत, जे ३ तोळ्यांचे आहेत. त्यांच्या पत्नीकडे १८ लाख रुपयांचे ३० तोळे सोन्याचे दागिने आहेत, तर त्यांच्याकडे १ लाख ४० हजार रुपयांचे २ किलो चांदीचे दागिने आहेत.

राजस्थानचे नवे मुख्यमंत्री एवढ्या संपत्तीचे मालक

भजनलाल शर्मा यांच्या मालकीच्या एकूण जंगम आणि स्थावर मालमत्तेबद्दल बोलायचे झाल्यास ती जवळपास १.५ कोटी रुपयांची आहे.

Story img Loader