Kapil Mohan Success Story : आनंदाचा प्रसंग असो वा दु:खाचा अशा वेळी काही जण मद्यपान जरूर करतात. परंतु तुम्ही कोणत्याही प्रसंगी मर्यादित प्रमाणात दारू प्यायल्यास तुमचे नुकसान होत नाही. खरं तर क्वचितच असा कोणी मद्यप्रेमी असेल ज्याने ओल्ड मॉन्कचे नाव ऐकले नसेल, परंतु तुम्हाला माहीत आहे का की, गोल बाटलीतील ओल्ड मॉन्क ही भारतातील सर्वात जुनी रम आहे, जिने आपल्या मादक जादूने ५० हून अधिक देशांमध्ये लोकांना वेड लावले आहे. वाईनच्या जगात ओल्ड मॉन्क ही खूपच नावाजलेली आहे. विशिष्ट व्हॅनिला चवीसाठी ओळखल्या जाणार्या या शानदार भारतीय रमने जगभरातील लाखो लोकांची मने जिंकली आहेत. या आयकॉनिक ब्रँडच्या यशामागे निवृत्त ब्रिगेडियर कपिल मोहन आहेत, ज्यांनी ओल्ड मॉन्कला आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवून दिली आहे.
ओल्ड मॉन्क एक प्रसिद्ध ब्रँड कसा बनला?
ब्रिगेडियर कपिल मोहन यांनी केवळ ओल्ड मॉन्कला एक वेगळीच उंची मिळवून दिली नाही, तर सोलन नंबर 1 आणि गोल्डन ईगल या प्रसिद्ध ब्रँडच्या मागेही ते आहेत. ओल्ड मॉन्क ही जगातील तिसरी सर्वाधिक विकली जाणारी रम आहे. विशेष म्हणजे ही बऱ्याच वर्षांपासून सर्वात मोठ्या भारतीय बनावटीच्या विदेशी दारू (IMFL) ब्रँडच्या यादीत आहे. कपिल मोहन हे मीकिन लिकर कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक होते. प्रसिद्ध उद्योगपती नरेंद्र नाथ मोहन यांचे पुत्र वेद रतन मोहन एकदा युरोपच्या दौऱ्यावर गेले असता त्यांना दारूचा हा व्यवसाय सुरू करण्याची कल्पना सुचली. डिसेंबर १९५४ मध्ये त्यांनी रम बेनेडिक्टाइनच्या धर्तीवर भारतात या मद्य कंपनीचा पाया रचना, ज्याने पुढे जाऊन युरोपमध्ये धुमाकूळ घातला. या रमच्या कारागिरीने प्रेरित होऊन त्यांनी ओल्ड मॉन्क तयार केली. सात वर्षांच्या अथक परिश्रमानंतर त्यांनी मसाल्यांनी युक्त एक आलिशान रम तयार करण्यात यश मिळवले.
कपिल मोहनने ओल्ड मॉन्कला वेगळ्या उंचीवर कसे नेले?
वेद मोहन यांच्या आकस्मिक निधनानंतर त्यांचे भाऊ कपिल मोहन यांनी या कंपनीची सूत्रे हाती घेतली. कपिल मोहन यांनी ओल्ड मॉन्कला एक वेगळीच उंची मिळवून दिली. कोणत्याही प्रचाराशिवाय प्रत्येक मद्यपान करणाऱ्याच्या ओठांवर रम म्हटलं की, पहिल्यांदा ओल्ड मॉन्कचेच नाव येते. कपिल मोहन यांना माहीत होते की, जर एखाद्याने ओल्ड मॉन्क प्यायली तर तो तिची चव विसरणार नाही. कपिल मोहन यांच्या नेतृत्वाखाली ओल्ड मॉन्क भारताची शान बनली. आज बाजारात तिचा वाटा मोठा आहे.
कपिल मोहन यांचे भारतीय लष्करातील योगदान
कपिल मोहन हे भारतीय लष्करात ब्रिगेडियर असले तरी देशसेवेतील अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना विशिष्ठ सेवा पदकानेही सन्मानित करण्यात आले आहे. त्यांची लष्करी पार्श्वभूमी शिस्त आणि समर्पणाचे उदाहरण आहे. ही झलक त्यांच्या कंपनीतही पाहायला मिळाली. कपिल मोहन यांच्या लष्करी सेवेबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्कारही मिळाला आहे. हा सन्मान त्यांच्या समाजातील महत्त्वपूर्ण योगदानाचे आणि त्यांच्या उल्लेखनीय नेतृत्व कौशल्याचे उदाहरण आहे. कपिल मोहन हे मोहन ग्रुपच्या इतर कंपन्यांचा भाग आहे. जसे की, ऑर्थोस ब्रुअरीज लिमिटेड, मोहन रॉकी स्प्रिंगवॉटर ब्रुअरीज लिमिटेड, सागर शुगर्स अँड अलाईड प्रॉडक्ट्स लिमिटेड, आर.आर. बी. एनर्जी लिमिटेड आणि सोलक्रोम सिस्टम्स इंडिया लिमिटेडचे संचालक देखील होते. त्यांनी पीएचडी केली होती आणि ट्रेड लिंक्स प्रायव्हेट लिमिटेडचे माजी व्यवस्थापकीय संचालक (१९५६-१९६६) देखील होते.
हेही वाचाः टोमॅटोनंतर आता ‘या’ राज्यात आले महागले, दर थेट ४०० रुपये किलो
कपिल मोहन यांचा इतर कामांमध्ये सहभाग
कपिल मोहन यांचे योगदान व्यवसायाच्या व्याप्तीच्या पलीकडेही होते. त्यांनी गाझियाबादमधील नरिंदर मोहन हॉस्पिटलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहिले आणि आरोग्य सेवाबद्दलच्या त्यांच्या वचनबद्धतेचे उदाहरण दिले. या व्यतिरिक्त त्यांनी जनरल मोहयाल ब्राह्मण सभेचे संरक्षक म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, मोहयाल ही ब्राह्मण समुदायाचे प्रतिनिधित्व करणारी सर्वोच्च संस्था आहे. विविध भारतीय कंपन्यांमधील त्यांच्या बहुमुखी सहभागामुळे त्यांचे अष्टपैलुत्व आणि कौशल्य आणखी दिसून आले.
हेही वाचाः Money Mantra : क्रेडिट कार्डाचे बिल ठरतेय डोकेदुखी? ‘या’ पद्धतीनं पटकन भरा अन् CIBIL स्कोर सुधारा
कपिल मोहन यांचे २०१८ मध्ये निधन झाले
२०१८ मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने कपिल मोहन यांचे दुःखद निधन झाले, परंतु त्यांचा वारसा आणि ओल्ड मॉन्कचा आत्मा अद्यापही कायम आहे. कंपनीचे दैनंदिन कामकाज आता त्यांचे पुतणे हेमंत आणि विनय मोहन यांच्या सक्षम हातात आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ओल्ड मंक कलाकुसरीच्या सामर्थ्याचे, प्रामाणिकपणाचे आणि एक निष्ठावान ग्राहक आधाराचे प्रतीक आहे.