नोकरदार असो की व्यावसायिक, प्रत्येकाला कधी ना कधी कर्ज घ्यावेच लागते. पण कर्ज मिळणेही तितके सोपे नाही. ही एक दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे आणि अनेक वेळा लोकांना खूप प्रयत्न करूनही चांगल्या व्याजदरावर अपेक्षित कर्ज मिळू शकत नाही किंवा त्यांना अशा प्रकारे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. यामागील एक प्रमुख कारण म्हणजे खराब क्रेडिट स्कोअर असणे हे आहे. काही वेळा गुंतागुंतीच्या आर्थिक बाबींची माहिती नसणे हीदेखील समस्या बनते, ज्यामुळे कर्जदारांना परिस्थिती नीट समजत नाही आणि त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागते.

क्रेडिट स्कोअर कसा ठरवला जातो?

देशातील एखाद्या व्यक्तीच्या किंवा कंपनीच्या क्रेडिट इतिहासाचे मूल्यमापन मुख्यतः क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड (CIBIL) द्वारे केले जाते. CIBIL ही २४०० पेक्षा जास्त सदस्य असलेली क्रेडिट रेटिंग फर्म आहे. यामध्ये एनबीएफसी, बँका आणि गृह वित्तपुरवठा व्यवसाय यांसारख्या वित्तीय संस्थांचा समावेश आहे. ५५ कोटींहून अधिक ग्राहक आणि संस्थांचा क्रेडिट इतिहास CIBIL स्कोअरद्वारे व्यवस्थापित केला जातो. एखादी वित्तीय संस्था कर्जदाराला कर्ज किंवा क्रेडिट कार्ड मंजूर करेल की नाही, याबद्दल CIBIL ची कोणतीही भूमिका नाही. पण हो, कर्ज इच्छुक व्यक्तीबद्दल झटपट मत तयार करण्यात ती महत्त्वाची भूमिका बजावते, असे नक्कीच म्हणता येईल. म्हणून जर तुमचा CIBIL स्कोअर चांगला असेल तर तुम्हाला कर्ज मिळण्याची शक्यता जास्त आहे. कमी CIBIL स्कोअर असूनही तुमचे कर्ज मंजूर झाले, तर समजा व्याजदर खूप जास्त बसणार आहे.

Full tax deduction for interest on home loan CREDAI demands from the Center
गृहकर्जावरील व्याज रकमेला संपूर्ण कर वजावट; ‘क्रेडाई’ची केंद्राकडे मागणी
Hindustan Unilever approves spin off of ice cream business into a separate listed company
आइस्क्रीम व्यवसायाच्या स्वतंत्र सूचिबद्ध कंपनीत विलगीकरणास हिदुस्तान युनिलिव्हरची…
S&P cuts economic growth forecast
अर्थव्यवस्थेच्या वाढीच्या अंदाजात ‘एस ॲण्ड पी’कडून घट
Adani Group claims to achieve growth without external debt assures investors of financial soundness
बाह्य कर्जांविना वाढ साधण्याचा अदानी समूहाचा दावा; गुंतवणूकदारांना आश्वस्त करण्यासाठी आर्थिक सुस्थितीची ग्वाही
8505 crores in inactive EPF accounts five times increase in amount in six years
निष्क्रिय ‘ईपीएफ’ खात्यात ८,५०५ कोटी पडून; सहा वर्षांत रकमेत पाच पटीने वाढ
Today’s Gold Silver Price 18 November 2024 | Gold Silver Rate fall Down today
Gold Silver Rate Today : सोन्या- चांदीच्या दरात सर्वात मोठी घसरण; ग्राहकांसाठी सुवर्ण संधी! दागिने खरेदी करण्यापूर्वी जाणून आजचे दर
Adani Power's projects in Bangladesh under review, firm will be hired to aid assessment
अदाणी समूहावर आणखी एक संकट, बांगलादेश सरकार करणार अदाणी पॉवरसह अनेक वीज निर्मिती करारांची चौकशी
Gold Silver Price Today 20 November 2024 in Marathi| maharashtra election result 2024
Gold Silver Price Today : महाराष्ट्र निवडणुक निकालापूर्वी सोन्याच्या दरात मोठी वाढ; खरेदी पूर्वी जाणून घ्या आजचे दर

क्रेडिट स्कोअर सुधारणे सोपे नाही

खराब क्रेडिट इतिहास दुरुस्त करणे हे एक आव्हानात्मक काम असू शकते, परंतु ते अशक्य नाही. क्रेडिट स्कोअर सुधारण्यासाठी खूप वेळ आणि मेहनत लागू शकते, परंतु एखाद्या व्यक्तीला चांगल्या अटींवर आणि कमी व्याजदरात कर्ज मिळवून देण्यास मदत करून ते दीर्घकाळ फेडावे लागत बसू शकते. क्रेडिट स्कोअर सुधारण्यासाठी आणि कर्ज मंजुरीची शक्यता वाढवण्यासाठी काही पावले उचलली पाहिजेत, याबद्दल जाणून घेऊयात

क्रेडिट अहवाल तपासणी

क्रेडिट ब्युरो (Equifax, Experian किंवा TransUnion) पैकी एकावर जाऊन त्यांचा क्रेडिट रिपोर्ट मिळवता येतो. त्रुटी किंवा चूक ओळखण्यासाठी तुमच्या अहवालाचे पुनरावलोकन करणे महत्त्वाचे आहे. त्यानंतरच तुम्ही त्यांना त्याचे निराकरण करण्यास सांगू शकता.

वेळेवर हप्ते फेडा

चांगला CIBIL स्कोर राखण्यासाठी सर्वोत्तम धोरणांपैकी एक म्हणजे कर्जाची वेळेवर परतफेड करणे. अशा प्रकारे कर्जदार कर्ज देणाऱ्या कंपनीवर सकारात्मक प्रभाव टाकू शकतो आणि पुढे कर्ज घेण्यास कोणतीही अडचण येणार नाही. सोप्या शब्दात सांगायची झाली तर कमी CIBIL स्कोअरचे सर्वात मोठे कारण म्हणजे कर्जाची थकबाकी भरण्यास विलंब हे आहे. अशा परिस्थितीत एखाद्या व्यक्तीने क्रेडिट कार्डद्वारे किंवा त्याच्या उत्पन्नानुसार आणि वेळेवर पैसे देण्याच्या क्षमतेनुसार कर्जाची निवड केली पाहिजे.

क्रेडिट कार्ड मर्यादित प्रमाणात वापरा

तुमचा क्रेडिट स्कोअर सुधारण्याचा सर्वात महत्त्वाचा मार्ग म्हणजे तुमची क्रेडिट कार्ड मर्यादा न वापरणे. क्रेडिट मर्यादेच्या केवळ ३० टक्के रक्कम खर्च केली जाईल, याची खात्री केल्याने क्रेडिट स्कोअर सुधारण्यात खूप मदत होऊ शकते. वास्तविक क्रेडिट कार्डद्वारे ३० टक्क्यांहून अधिक खर्च करणे म्हणजे तुम्ही विचार न करता तुमचा खर्च वाढवता, असं होते. यामुळे तुमचा स्कोअर कमी होईल.

हेही वाचाः एकेकाळी बुडण्याच्या उंबरठ्यावर होती Apple, आज २३५ लाख कोटींची कंपनी, टीम कूक यांच्या यशाचं रहस्य काय?

सुरक्षित क्रेडिट कार्ड

जर एखाद्याला क्रेडिट कार्ड मिळविण्यात अडचण येत असेल तर सुरक्षित क्रेडिट कार्ड हा एक चांगला पर्याय असू शकतो. कोणत्याही व्यक्तीला मुदत ठेवींवर सुरक्षित क्रेडिट कार्ड जारी केले जाऊ शकते. फिक्स्ड डिपॉझिटमध्ये जमा केलेल्या पैशाच्या आधारावर त्याची मर्यादा ठरवली जाते. त्याचा योग्य वापर केल्यास क्रेडिट स्कोअर वाढण्यास मदत होऊ शकते.

हेही वाचाः Akshay Tritiya 2023 What to buy : अक्षय्य तृतीयेला करा शुभ सुरुवात; ‘या’ ५ गोष्टींमध्ये गुंतवणूक करून मिळवू शकता लाभ

क्रेडिट मिक्समध्ये बॅलन्स ठेवा

क्रेडिट मिक्स नेहमी संतुलित असावे. जेव्हा क्रेडिट स्कोअर कमी होतो, तेव्हा लोक अनेकदा ते क्रेडिट कार्ड रद्द करतात आणि नवीन कार्डसाठी अर्ज करतात. पण असे करू नका. याचा CIBIL स्कोअरवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते, चांगला CIBIL स्कोअर राखण्यासाठी सुरक्षित आणि असुरक्षित क्रेडिट मिक्समध्ये बॅलन्स असणे आवश्यक आहे.