मुंबईः औद्योगिक व कृषी क्षेत्रात वापर असलेल्या आणि दर वर्षी ८ टक्के दराने वाढणाऱ्या भारतातील सूक्ष्मतुषार (एरोसॉल) क्षेत्राला चालना देण्यासाठी मुंबईत येत्या शुक्रवार, २८ फेब्रुवारी ते १ मार्च दरम्यान जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे सहाव्या ‘इंडिया एरोसॉल्स एक्स्पो (आयएई २०२५)’ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

एरोसॉल प्रमोशन कौन्सिलद्वारे (एपीसी) दर दोन वर्षांनी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत असून, वैयक्तिक निगा, आरोग्यसेवा, घर तसेच वाहन निगा, शेतीची निगा, स्प्रे उत्पादने, पेंट व कोटिंग स्प्रे, ल्युब्रिकंट्स, क्लीनर्स अशी विविधांगी एरोसॉल उत्पादने या प्रदर्शनानिमित्ताने पाहता येतील. या व्यापार मेळ्यासाठी भारतीय व जागतिक पातळीवरील एरोसॉल उद्योगातील तज्ज्ञ, उत्पादक व सृजनकर्ते एकत्र येणार आहेत.

एपीसीचे मानद सचिव व उपाध्यक्ष हरिश अरोरा यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे २०२३ मध्ये एरोसॉल क्षेत्रातील स्थानिक उलाढाल ६३.५ कोटी अमेरिकी डॉलर इतकी असून, २०३१ पर्यंत ती १०० कोटी डॉलरपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. नवनवीन संकल्पना, पर्यावरणपूरकता आणि वाढते उत्पन्न व जीवनशैलीतील बदलामुळे या उत्पादनांची मागणी वाढत असल्याचे ते म्हणाले.

Story img Loader