मुंबई: आर्थिक आणि औद्योगिक वाढीचा महत्त्वाचा घटक असलेल्या ऊर्जा क्षेत्रावर केंद्रित नवीन योजना आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाने, ‘आयसीआयसीआय प्रुडेन्शियल एनर्जी अपॉर्च्युनिटीज फंड’ नावाने प्रस्तुत केली आहे. ही ओपन-एंडेड समभागसंलग्न (इक्विटी) योजना प्रामुख्याने पारंपरिक आणि अक्षय्य ऊर्जेशी संबंधित व्यवसायांमध्ये गुंतलेल्या किंवा त्याचा फायदा घेत असलेल्या कंपन्यांच्या समभागांमध्ये गुंतवणूक करणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : पुढील दशक उत्पादन क्षेत्राचे, डीएसपी म्युच्युअल फंडाचा आशावाद

योजनेतील प्रारंभिक गुंतवणूक (एनएफओ) १६ जुलैपर्यंत खुली आहे. योजनेच्या अनावरणप्रसंगी बोलताना आयसीआयसीआय प्रुडेन्शियल एएमसीचे कार्यकारी संचालक आणि मुख्य गुंतवणूक अधिकारी, जे या योजनेचे निधी व्यवस्थापकदेखील आहेत, शंकरन नरेन म्हणाले, ऊर्जा हा औद्योगिक विकास आणि आर्थिक वाढीचा पाया आहे. अक्षय्य ऊर्जेकडे गतिमान संक्रमण आणि निव्वळ शून्य उत्सर्जनाचे उद्दिष्ट साध्य करण्यावर सरकारचे लक्ष पाहता, हे एक लक्षणीय वाढीची क्षमता असलेले क्षेत्र ठरते. या योजनेद्वारे गुंतवणूकदार तेल आणि वायू, ते अपारंपरिक ऊर्जा, जैवऊर्जा आणि ऊर्जा मूल्य साखळीतील कोळसा, पारेषण, वीज व्यापार, वंगण आदी कंपन्यांच्या पोर्टफोलिओमध्ये प्रवेश मिळवू शकतील. निफ्टी एनर्जी इंडेक्सने अलीकडेच बाजारापेक्षा चांगली कामगिरी केली असली तरी या क्षेत्राचे मूल्यांकन वाजवी राहिले आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. त्यांच्यासह नित्या मिश्रा या योजनेचे निधी व्यवस्थापन पाहतील आणि ‘निफ्टी एनर्जी टीआरआय’ हा योजनेचा मानदंड निर्देशांक असेल.