मुंबई: आयसीआयसीआय प्रुडेंशियल लाइफ इन्शुरन्सने ‘आयसीआयसीआय प्रु गिफ्ट सिलेक्ट’ ही नवीन दीर्घकालीन बचत योजना प्रस्तुत केली असून, जी ग्राहकांना निश्चित उत्पन्नाची खात्री देते आणि त्यांना गरजेच्या वेळी पैसे काढण्याची सुविधाही देते.
योजनेत ग्राहकांना अनेक लवचिक पर्याय उपलब्ध आहेत. निश्चित उत्पन्न कधी सुरू करायचे, निश्चित उत्पन्नाचा कालावधी, परिपक्वतेच्या म्हणजेच योजनेच्या मुदतपूर्ततेला ठरावीक रक्कम मिळविण्याचे स्वातंत्र्य योजनेत आहे. शिवाय, जीवन विम्याचे कवच देखील आहे, जे कुटुंबासाठी आर्थिक संरक्षण प्रदान करते.
या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे वाढत्या उत्पन्नाचा पर्याय, ज्यात उत्पन्न दरवर्षी ५ टक्के चक्रवाढ दराने वाढते. यामुळे महागाईच्या काळात देखील आर्थिक व्यवस्थापनास मदत होईल, असे आयसीआयसीआय प्रुडेंशियल लाइफ इन्शुरन्सचे उत्पादनप्रमुख आणि वितरण अधिकारी अमित पालटा म्हणाले. ग्राहकांना त्यांचे आर्थिक उद्दिष्ट आणि रोख प्रवाहाच्या गरजांनुसार निश्चित उत्पन्नाची हमी ही योजना देते. २०२४-२५ आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत कंपनीचा दावे निवारणाचा (क्लेम सेटलमेंट) दर ९९.३ टक्के इतका राहिला आहे, म्हणजेच जवळपास सर्व विमा दावे कंपनीने यशस्वीपणे निकाली काढले आहेत.