मुंबई: देशातील दुसरी सर्वात मोठी मालमत्ता व्यवस्थापन कंपनी असलेल्या आयसीआयसीआय प्रुडेंशियलच्या ‘व्हॅल्यू डिस्कव्हरी फंडा’ने २० वर्षे पूर्ण केली असून, या काळात गुंतवणूकदारांना २१ टक्क्यांहून अधिक चक्रवाढ परतावा दिला आहे. म्हणजेच २० वर्षांपूर्वी गुंतवलेल्या १० लाखांचे ताजे गुंतवणूकमूल्य जवळपास ४.५० कोटी रुपये झाले आहे. निफ्टी निर्देशांकाच्या समान कालावधीतील वार्षिक सरासरी १६ टक्के परताव्याच्या तुलनेत, त्यातील समान गुंतवणुकीचे केवळ २ कोटी रुपये झाले आहेत.

द्विदशकपूर्ती निमित्ताने आयसीआयसीआय प्रुडेंशियल एएमसीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्याधिकारी निमेश शहा म्हणाले, व्हॅल्यू (मूल्यात्मक) गुंतवणुकीसाठी संयम राखणे आवश्यक असते. कारण पूर्ण परतावा मिळण्यास वेळ लागू शकतो. आयसीआयसीआय प्रुडेन्शियल व्हॅल्यू डिस्कव्हरी फंडाच्या प्रवासाने नेमके हेच दाखवून दिले आहे.

Indian rupee latest marathi news
रुपयाची प्रतिडॉलर ८५ च्या दिशेने वाटचाल
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
government banks earned net profit
सरकारी बँकांना सहामाहीत ८६ हजार कोटींचा निव्वळ नफा
Asian development bank marathi news
विकासदर अंदाजाला ‘एडीबी’कडूनही ६.५ टक्क्यांपर्यंत कात्री
public sector banks npa marathi news
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे ‘एनपीए’ ३.१६ लाख कोटींवर
jan dhan account marathi news
अकरा कोटी निष्क्रिय जनधन खात्यांमध्ये १४,७५० कोटी पडून
equity funds investment declined
इक्विटी फंडांतील ओघ ओसरला! नोव्हेंबरमध्ये १४ टक्क्यांनी घटून ३५,९४३ कोटींवर
sunk deposits loksatta news
विश्लेषण : बुडालेल्या ठेवी परत मिळू शकतात? शासनाचे नवे परिपत्रक काय?

हेही वाचा : Gold Silver Price Today : सोने- चांदीच्या दरात पुन्हा मोठी वाढ! जाणून घ्या तुमच्या शहरातील २२ कॅरेट सोन्याचा दर

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल व्हॅल्यू डिस्कव्हरी फंड हा देशातील सर्वात मोठा व्हॅल्यू (मूल्यात्मक) श्रेणीतील फंड आहे. फंडाची मालमत्ता (एयूएम) ४८,८०६ कोटी रुपये आहे. म्युच्युअल फंडाच्या व्हॅल्यू श्रेणीतील एकूण मालमत्ता या एकट्या फंडाची मालमत्ता २६ टक्के आहे. गत एका वर्षात फंडाने ४३ टक्के परतावा दिला आहे. तीन आणि पाच वर्षांत त्याचा चक्रवाढ परतावा अनुक्रमे २७.२८ टक्के आणि २६ टक्के राहिला आहे.

हेही वाचा : Edible Oil : ऐन सणासुदीच्या काळात खाद्यतेल महागणार, आयात शुल्कात २० टक्क्यांची वाढ

आयसीआयसीआय प्रुडेंशियल एएमसीचे कार्यकारी संचालक आणि मुख्य गुंतवणूक अधिकारी एस नरेन म्हणाले, २००४ मध्ये जेव्हा आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाने व्हॅल्यू डिस्कव्हरी फंड प्रस्तुत केला तेव्हा भारतासारख्या बाजारपेठेत याबद्दल शंका व्यक्त केली गेली होती. मात्र फंड घराण्याचा दृढ विश्वास होता की अमेरिकेसारख्या विकसित अर्थव्यवस्थांमध्ये यशस्वी ठरलेल्या व्हॅल्यू गुंतवणूक पद्धतीला येथेही निश्चित स्वीकारले जाईल. दोन दशकांमध्ये आयसीआयसीआय प्रुडेंशियल व्हॅल्यू डिस्कव्हरी फंडाच्या कामगिरीने हे दाखवून दिले आहे.

Story img Loader