Income Tax Refund: ज्या लोकांनी प्राप्तिकर रिटर्न भरले आहेत, त्यापैकी बहुतेकांना आतापर्यंत परतावा मिळाला असेल. त्याचबरोबर अनेकांना यासाठी अजून थोडी वाट पाहावी लागणार आहे. ज्यांना आयटीआर रिफंड मिळालेला नाही, त्यांच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे आणि त्यांनी याबाबत काळजी घेणेसुद्धा आवश्यक आहे. प्राप्तिकर परताव्याशी संबंधित एक मेसेज मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तुमच्या खात्यात १५,४९० रुपये किंवा इतर रक्कम परत आली आहे आणि ते मिळविण्यासाठी तुम्हाला तुमचे बँक खात्याची खातरजमा म्हणजेच ते अपडेट करावे लागेल, असं सांगितलं जात आहे. जर तुम्हाला अशा प्रकारचा मेसेज आला असेल तर आताच सावध राहा आणि त्याला उत्तर देऊ नका.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खरं तर हा मेसेज प्राप्तिकर विभागाने पाठवला नसून फसवणूक करण्याच्या उद्देशाने तो व्हायरल केला जात आहे. कारण ITR दाखल करण्याची शेवटची तारीख संपली आहे आणि बहुतेक लोकांनी त्यांचा ITR दाखल केला आहे. त्यानंतर करदाते त्यांच्या रिफंडची वाट पाहत आहेत. अशा स्थितीत ऑनलाइन फसवणूक करणारे या संधीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. हे स्पॅमर लोकांना बनावट प्राप्तिकर परतावा मेसेज देऊन फसवण्याचे कामही करीत आहेत.

फेक मेसेजमध्ये नेमकं काय आहे?

व्हायरल झालेला स्पॅम मेसेज पीआयबी फॅक्टचेकने शेअर केला आहे. मेसेजमध्ये असे लिहिले आहे की, “प्रिय सर, तुम्हाला १५,४९०/- रुपयांचा प्राप्तिकर परतावा मंजूर करण्यात आला आहे, ही रक्कम लवकरच तुमच्या खात्यात जमा केली जाणार आहे. कृपया तुमचा खाते क्रमांक 5XXXX6755 पडताळून घ्या. ते बरोबर नसल्यास कृपया खालील लिंकवर जाऊन तुमच्या बँक खात्याची माहिती अपडेट करा. https://bit.ly/20wpYK6″. हे ट्विट प्राप्तिकर विभागानेही री-ट्विट केले असून, लोकांना याला बळी पडू नये, असा इशारा देण्यात आला आहे.

हेही वाचाः एलॉन मस्क टेस्लाचे पहिले कार्यालय पुण्यात उघडणार, जाणून घ्या किती आहे भाडे?

प्राप्तिकर विभाग रिफंडची माहिती कशी देतो?

प्राप्तिकर रिटर्न भरणाऱ्या करदात्यांनी नेहमी लक्षात ठेवावे की, प्राप्तिकर विभाग तुम्हाला मेसेजद्वारे बँक खात्याचे तपशील प्रदान करण्यास किंवा अपडेट करण्यास किंवा पडताळणी करण्यास सांगणार नाही. प्राप्तिकर परतावा रिटर्न भरताना करदात्यांनी प्रदान केलेल्या पूर्व प्रमाणित बँक खात्यांवर थेट पाठविला जातो. प्राप्तिकर विभागाद्वारे नोंदणीकृत ईमेल आयडी आणि मोबाईल क्रमांकांद्वारे करदात्यांना परताव्याची सूचना देखील पाठविली जाते. प्राप्तिकर विभागाकडून आयटीआरची योग्य प्रक्रिया केल्यानंतरच परतावा पाठविला जातो. जर आयटीआरवर प्रक्रिया केली गेली नाही आणि कर विभागाला अधिक माहिती हवी असेल, तर ते करदात्यांच्या नोंदणीकृत ईमेल आयडीवर सूचना पाठवतात.

हेही वाचाः मोदी सरकारने आणखी एका सरकारी कंपनीला दिला ‘नवरत्न’चा दर्जा, यादीत आता १४ नावांचा समावेश

तुम्हाला एसएमएस किंवा इतर मेसेजिंग अॅपद्वारे मेसेज प्राप्त झाल्यास काय करावे?

जर तुम्ही एसएमएस किंवा इतर मेसेजिंग अॅपद्वारे पाठवलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक केले नाही. तुम्ही फक्त प्राप्तिकर विभागाने पाठवलेल्या अधिकृत मेसेजलाच प्रतिसाद द्यावा.

तुम्हाला लिंकवर क्लिक करून बँक तपशील अपडेट किंवा पडताळण्यास सांगणारा कोणताही मेसेज मिळाल्यास तुम्ही त्या मेसेजविरुद्ध प्राप्तिकर विभागाकडे तक्रार नोंदवावी.

ITR भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२३ होती, पण जे या तारखेपर्यंत ITR दाखल करू शकले नाहीत, त्यांना आता ३१ डिसेंबरपर्यंत संधी आहे.

तसेच प्राप्तिकर विभागाकडून काही माहितीही देण्यात आली आहे, जी जाणून घेऊन तुम्ही तुमचा ITR दाखल करू शकता.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: If you get messages related to income tax refund be careful know the truth behind the claim vrd
Show comments