म्युच्युअल फंड योजनेबाबत बाजार नियामक सेबी(SEBI)ने नवा नियम जारी केला आहे. त्यानंतर पालक आता त्यांच्या बँक खात्यातून त्यांच्या मुलांच्या नावे म्युच्युअल फंड योजनांमध्ये सहज गुंतवणूक करू शकतील. यासाठी संयुक्त खाते किंवा अल्पवयीन मुलांचे खाते उघडण्याची गरज नाही. बाजार नियामक सेबीने याबाबत परिपत्रक जारी केले आहे. सेबीच्या या बदलामुळे जे लोक आपल्या मुलांच्या भविष्यासाठी म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणूक करतात, त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI/HO/IMD/DF3/CIR/P/2019/166) द्वारे जारी केलेल्या परिपत्रकाचे मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांकडून पालन केले जाते, ज्यात अल्पवयीन मुलांच्या नावावर गुंतवणूक करण्याच्या नियमात सुधारणा करण्यात आली आहे.

हेही वाचाः वेळेवर व्हीलचेअर न मिळाल्याने एका व्यक्तीचा मृत्यू; विमानतळ प्रशासन आणि इंडिगो देणार १२ लाखांची भरपाई

काय आहे नवीन नियम?

परिपत्रकात म्हटले आहे की, अल्पवयीन मुलांच्या नावावर असलेल्या म्युच्युअल फंड योजनांमध्ये अल्पवयीन, पालक आणि संयुक्त बँक खात्यातून गुंतवणूक केली जाऊ शकते. याबरोबरच बाजार नियामकाकडून सांगण्यात आले आहे की, म्युच्युअल फंड योजनेत अल्पवयीन व्यक्तीच्या नावावर पैसे काढल्यास, पैसे केवळ त्या अल्पवयीन व्यक्तीच्या अधिकृत बँक खात्यात जमा केले जावेत. विशेष म्हणजे इतर कोणत्याही नियमांमध्ये सेबीने कोणताही बदल केलेला नाही.

हेही वाचाः युरोपियन सेंट्रल बँकेची गोल्डमन सॅक्सवर कठोर कारवाई, माहिती लपविल्याबद्दल ठोठावला ७२ लाख डॉलरचा दंड

नवा नियम कधी लागू होणार?

नवीन नियम १५ जून २०२३ पासून लागू होणार आहे. नवीन नियमांनुसार म्युच्युअल फंडातील व्यवहार सुलभ करण्यासाठी आवश्यक बदल करण्यासाठी सेबीने सर्व AMCs ला सल्ला दिला आहे.