वॉशिंग्टन : २०२३-२४ या चालू आर्थिक वर्षांसाठी देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) वाढीचा दर २० आधार बिंदूंनी कमी होऊन ५.९ टक्क्यांपर्यंत घसरेल, असा धोक्याचा इशारा देणारा सुधारित अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) मंगळवारी वर्तविला. याआधी आयएमएफने विकासदर ६.१ टक्के राहण्याचे भाकीत केले होते. तथापि, खालावलेल्या या सुधारित अंदाजानंतरही भारतच जगातील सर्वाधिक वेगाने आर्थिक विकास साधणारा देश असेल, असे आयएमएफने स्पष्ट केले आहे.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या जागतिक आर्थिक दृष्टिकोन दर्शविणाऱ्या अहवालाने, जागतिक अर्थवृद्धीही २०२३ सालात २.९ टक्क्यांवरून, २.८ टक्क्यांवर येण्याचे सुधारित अनुमान पुढे आणले आहे, जे २०२२ मधील ३.४ टक्क्यांच्या तुलनेत तब्बल अर्धा टक्क्यांची घसरण दर्शविणारे आहे. भारताच्या दृष्टीने सरलेल्या आर्थिक वर्षांतील ६.८ टक्क्यांच्या तुलनेत विद्यमान आर्थिक वर्षांत अर्थव्यवस्था वाढीचा दर ५.९ टक्के असेल. २०२४-२५ या आगामी आर्थिक वर्षांसाठीचा अंदाजही जानेवारीत वर्तवलेल्या ६.८ टक्क्यांवरून ६.३ टक्क्यांपर्यंत कमी केला गेला आहे.

Action will be taken against employees who refuse election work
निवडणूकीचे काम नाकारणाऱ्या कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
nashik vidhan sabha
नाशिक परिक्षेत्रात २५ दिवसांत ५० कोटींचा मुद्देमाल जप्त, १७ हजार गुन्हेगारांविरुध्द कारवाई
home voting nashik
नाशिक: गृह मतदानापासून हजारो ज्येष्ठ मतदार, अपंग वंचित; यंत्रणेच्या अनास्थेमुळे ८५ हजार पैकी केवळ २४४९ मतदारांना लाभ
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
Rohit Pawar scandal regarding 32 IT companies in Hinjewadi
“हिंजवडी मधील ३२ आयटी कंपन्या गुजरातला जाणार”; रोहित पवारांचा गौप्यस्फोट, गेल्या दहा वर्षात एक ही…!
Maharashtra government financial burden
महायुतीच्या लोकप्रिय आश्वासनांमुळे तिजोरीवर दीड ते दोन लाख कोटींचा अधिक आर्थिक भार ?
Assembly Elections 2024 Akkalkuwa-Akrani Assembly Constituency Congress
लक्षवेधी लढत: अक्कलकुवा: लोकसभेतील पराभवाचे उट्टे काढणार का?

भारतानंतर चीनचा विकासवेग सर्वाधिक राहिल, असे या अहवालाची आकडेवारी दर्शविते. चीनचा विकासदर २०२३ मध्ये ५.२ टक्के आणि २०२४ मध्ये ४.५ टक्के राहण्याचा अंदाज अहवालाने वर्तविला आहे. जो २०२२ मध्ये केवळ ३ टक्के नोंदवला गेला होता.

जागतिक पातळीवर करोनाची महासाथ आणि त्यानंतर युक्रेनवरील रशियाच्या आक्रमणानंतर, महागाईला प्रतिबंध म्हणून व्याजदर वाढीमुळे आर्थिक अरिष्ट ओढवण्याची भीती निर्माण झाली होती. मात्र या प्रतिकूल परिस्थितीतून जागतिक पातळीवर उभारीच्या दिशेने मार्गक्रमण होत असल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच जागतिक अर्थवृद्धीला प्रभावित करणाऱ्या चीनच्या अर्थव्यवस्थेने जोरदार पुनरागमन केले आहे. पुरवठा-साखळीतील व्यत्यय कमी होत आहे, असे आयएमएफचे मुख्य अर्थतज्ज्ञ पीएरे-ऑलिव्हियर गौरींचास यांनी सांगितले.

गौरींचास यांच्या मते, या वर्षीची आर्थिक मंदी प्रगत अर्थव्यवस्थांवर केंद्रीत आहे. विशेषत: युरोपीय संघ आणि अन्य युरोपीय देशांमधील विकासदर अनुक्रमे १.४ आणि १ टक्क्यांपर्यंत वाढण्याआधी तो चालू आर्थिक वर्षांत ०.८ टक्के आणि उणे ०.३ टक्के होण्याची घसरण्याची चिन्हे आहेत. याउलट, उभरत्या आणि विकसनशील अर्थव्यवस्थांची स्थिती चांगली राहण्याची शक्यता असून, चालू वर्षांअखेर त्या ४.५ टक्के दराने विकास साधताना दिसू शकतील.

महागाई नियंत्रणासाठी जगभरातील मध्यवर्ती बँकांनी समन्वयाने आणि एकसाथ केलेल्या व्याजदर वाढीमुळे स्थिती उत्तरोत्तर नियंत्रणात येत आहे. महागाई निश्चित लक्ष्याकडे परत येण्याबरोबर त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत. आयएमएफच्या ताज्या अंदाजानुसार, २०२४ मध्ये जागतिक अर्थव्यवस्था ३ टक्के विकासदर गाठण्याआधी तो चालू वर्षांत २.८ टक्क्यांपर्यंत खाली येईल. तसेच जागतिक महागाई दर २०२२ मधील ८.७ टक्क्यांवरून, ७ टक्क्यांपर्यंत कमी होईल. २०२४ मध्ये तो ४.९ टक्क्यांपर्यंत खाली येण्याचा गौरींचास यांनी सकारात्मक अंदाज वर्तविला.

रिझव्‍‌र्ह बँकेच्या अंदाजाला छेद

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने वर्तविलेला ५.९ टक्के वाढीचा अंदाज रिझव्‍‌र्ह बँकेच्या अंदाजापेक्षा कमी आहे. २०२२-२३ मध्ये ७ टक्के वाढ आणि चालू आर्थिक वर्षांत विकासदर ६.४ टक्के राहील, असे मध्यवर्ती बँकेचे भाकीत आहे. केंद्र सरकारने २०२२-२३ या आर्थिक वर्षांतील जीडीपी वाढीची अधिकृत आकडेवारी अद्याप जाहीर केलेली नाही.