वॉशिंग्टन : आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) केंद्रीय अर्थसंकल्प दिवसभरावर असताना, भारतीय अर्थव्यवस्थेच्या सुदृढतेवर मोहोर उमटवत २०२४-२५ आर्थिक वर्षासाठी सकल राष्ट्रीय उत्पादन अर्थात जीडीपी वाढीचा अंदाज २० आधार बिंदूंनी वाढवून ६.५ टक्क्यांवर नेत असल्याचे मंगळवारी जाहीर केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जागतिक बहुस्तरीय संस्थेने व्यक्त केलेला ६.५ टक्क्यांच्या विकासदराचा सुधारीत अंदाज हा, भारतीय अर्थव्यवस्थेसंबंधी अन्य विश्लेषकांच्या अनुमानांपेक्षा कमी आहे. या वर्षात ७ टक्के किंवा त्याहून अधिक वाढीचा दर अर्थव्यवस्थेकडून गाठला जाईल, असा अनेकांचा अंदाज आहे. शिवाय नाणेनिधीनेच याआधी २०२३-२४ मध्ये वर्तवलेल्या ६.७ टक्क्यांच्या अंदाजापेक्षाही तो कमी आहे.

हेही वाचा >>> शेतकरी पतसंस्थांना लवकरच संगणकीकरणाचा बाज; केंद्रीय सहकारमंत्र्यांकडून २२५ कोटींचा प्रकल्प  

उल्लेखनीय म्हणजे नाणेनिधीने २०२५-२६ साठी अंदाजातही २० आधारबिंदूनी वाढीसह ६.५ टक्क्यांचा सुधारीत अंदाज व्यक्त केला आहे.
भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ २०२४ आणि २०२५ या दोन्ही वर्षांमध्ये ६.५ टक्क्यांच्या मजबूत पातळीवर राहण्याचा अंदाज आहे, दोन्ही वर्षांसाठी ऑक्टोबरपासून ०.२ टक्के अर्थात २० आधार बिंदूची सुधारणा देशांतर्गत मागणीतील सक्षमतेला प्रतिबिंबित करते, असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या जागतिक आर्थिक दृष्टीक्षेप मांडणाऱ्या अहवालात म्हटले आहे.

अंतरिम अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्रालयाने सोमवारी प्रसिद्ध केलेल्या अर्थव्यवस्थेच्या अवलोकन अहवालात, २०२४-२५ मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर ७ टक्क्यांच्या जवळ असू शकतो, असे म्हटले आहे. हे अनुमान खरे ठरले, तर करोना साथीनंतर सलग चौथ्या वर्षी भारतीय अर्थव्यवस्था ७ टक्के किंवा त्याहून अधिक दराने वाढलेली असेल. सरकारच्या खर्च आणि उत्पन्नांतील तफावत अर्थात वित्तीय तूट ही जीडीपीच्या तुलनेत चालू वर्षअखेर ५.९ टक्के मर्यादेत, तर आगामी २०२४-२५ मध्ये ५.३ टक्के पातळीवर राखण्याच्या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठीही ते मदतकारक ठरेल.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Imf raises india s fy25 gdp growth forecast to 6 5 percent print eco news zws