Gold and silver rates today, January 1 2025 : भारतातील सोन्याच्या किमती प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय बाजारातील ट्रेंडवर परिणाम करतात. विशेषत: लंडन ओटीसी आणि कॉमेक्स सारख्या बाजारपेठांमध्ये ते महत्त्वाचीभूमिका पार पाडतात. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी, सोन्याच्या दरात किंचित घसरण झाली, ज्यामुळे खरेदीदारांना काहीसा दिलासा मिळाला.

“येत्या वर्षी सोन्याच्या किमती स्थिर राहण्याची शक्यता आहे, परंतु सुरक्षित गुंतवणूक म्हणून त्याचे मूल्य वाढू शकते. येत्या वर्षात जागतिक स्तरावर सोने २९००-३००० डॉलर आणि भारतात ८४,००० ते ८५,००० रुपयांपर्यंत पोहोचेल, एकूण किंमतीमध्ये ५-७ टक्केच्या मध्यम परतावा येईल अशी अपेक्षा आहे” असे ईबीजी – कमोडिटी आणि करन्सी रिसर्च, जेएम फायनान्शियल सर्व्हिसेसचे उपाध्यक्ष , प्रणव मेर यांनी फायनान्शिअल एक्सप्रेसला सांगितले.

Viral video of groom ukhana at wedding navardevacha ukhana viral on social media
“मुलगी काळी…”, नवरदेवाने घेतला जगात भारी उखाणा, VIDEO पाहून कराल कौतुक
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Sprouted coconuts What they are and if its advisable to have them
अंकुरलेले नारळ म्हणजे काय? ते खाणे योग्य आहे का? तज्ज्ञ काय सांगतात…
shashank ketkar will become father for second time
शशांक केतकर दुसऱ्यांदा बाबा होणार! नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी दिली गुडन्यूज, पत्नी व मुलासह केलं खास फोटोशूट
Groom funny dance at baarat video went viral on social medi
मुलांनो असा डान्स येत असेल तरच लग्न करा! वरातीत नवरदेवाने धरला ठेका, VIDEO पाहून पोट धरून हसाल
Eating Guava in winters can improve heart health, reduce blood sugar 8 Health Benefits of Guava Fruit
Guava Fruit Benefits: हिवाळ्यात रोज पेरू खाल्ल्यास काय होते? आश्चर्यकारक फायदे वाचून तुम्हीही रोज पेरू खाल
pimpri chinchwad construction timing
पिंपरी : बिल्डरांना ‘या’ वेळेत बांधकाम करता येणार नाही; महापालिकेकडून नियमावली जारी
industry Hinjewadi IT Park, Chakan MIDCpune pimpri chinchwad
हिंजवडी आयटी पार्क ते चाकण एमआयडीसी : नव्या वर्षात सुटो उद्योगांचे ग्रहण !

सोने आणि चांदीचे दर आज, १ जानेवारी (Gold and silver rates today, January 1)

Good Returnsने दिलेल्या माहितीनुसार, १ जानेवारी रोजी भारतात २४ कॅरेट सोन्याचा दर ७७,५५० रुपये प्रति १० ग्रॅम होता. २४ कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅमचा दर ७,७५५ रुपये आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा दर ७१,०९० रुपये प्रति १० ग्रॅम होता.

१ जानेवारी रोजी, २४-कॅरेट सोन्याचा भाव १० ग्रॅमसाठी ७७,५५० रुपये, तर चांदीचा भाव ९०,४०० रुपये प्रति किलोग्रॅमवर ​​घसरला.

मुंबईत १ जानेवारीला सोन्याचा दर (Gold rate in Mumbai on January 1)

मुंबईत आज सोन्याचा दर ७७,५५० रुपये प्रति १० ग्रॅम इतका आहे. ३० डिसेंबर रोजी ७७,५६० रुपये प्रति १० ग्रॅम इतका होता.

१ जानेवारीला मुंबईतील चांदीचा दर (Silver rate in Mumbai on January 1)

१ जानेवारी रोजी मुंबईत चांदीचा दर ९०,४०० रुपये प्रति किलोग्रॅम आहे तर आदल्या दिवशी तो ९०,५०० प्रति किलो इतका होता.

दिल्लीत १ जानेवारीला सोन्याचा दर (Gold rate in Delhi on January 1)

१ जानेवारी रोजी दिल्लीत २४ कॅरेटसाठी सोन्याचा दर ७७,७०० प्रति १० ग्रॅम आहे. २२ कॅरेटसाठी सोन्याचा भाव ७१,२४० प्रति १० ग्रॅम इतका होता.

दिल्लीत १ जानेवारीला चांदीचा दर (Silver rate in Delhi on January 1)

दिल्लीत चांदीचा दर १ जानेवारीला ९०,४०० रुपये प्रति किलो होता. १ जानेवारीला चांदीचा १० ग्रॅमचा भाव ९०४ रुपये इतका आहे.

कोलकात्यात १ जानेवारीला सोन्याचा दर (Gold rate in Kolkata on January 1)

हेही वाचा – सोने – २०२४ मधील सर्वोत्तम २३ टक्के लाभ देणारी मालमत्ता, मौल्यवान धातूच्या झळाळीला ९०,००० रुपयांची भाव-पातळी खुणावतेय!

कोलकात्यात सोन्याचा दर आज १ जानेवारी ७७,५५० प्रति १० ग्रॅम आहे तर २२ कॅरेटसाठी ७१,०९० प्रति १० ग्रॅम इतका आहे.

कोलकातामध्ये १ जानेवारी रोजी चांदीचा दर (Silver rate in Kolkata on January 1)

आज, कोलकातामध्ये चांदीचा दर ९०,४०० रुपये प्रति किलो आहे आणि १० ग्रॅमसाठी, त्याची किंमत ९०४ रुपये आहे.

चेन्नईमध्ये १ जानेवारीला सोन्याचा दर (Gold rate in Chennai on January 1)

१ जानेवारी रोजी चेन्नईमध्ये २४ कॅरेट सोन्यासाठी ७७,५५० प्रति १० ग्रॅम सोन्याचा दर आहे आणि २२ कॅरेटचा दर ७१,०९० प्रति १० ग्रॅम आहे.

चेन्नईमध्ये १ जानेवारीला चांदीचा दर (Silver rate in Chennai on January 1)

चेन्नईमध्ये आज १ जानेवारी रोजी चांदीचा दर ९७,९०० रुपये प्रति किलो आहे आणि १० ग्रॅमसाठी त्याची किंमत ९७९ रुपये आहे.

पुण्यामध्ये १ जानेवारीला सोन्याचा दर (Gold rate in Pune on January1 )

bullionsनुसार १ जानेवारी रोजी पुण्यात २४ कॅरेट सोन्याचा दप ७८,८८० प्रति १० ग्रॅम इतका आहे आणि २२ कॅरेटचा दर ७०,४७३ प्रति १० ग्रॅम आहे.

पुण्यामध्ये १ जानेवारीला चांदीचा दर (Silver rate in Pune on January 1)

bullionsनुसार, पुण्यात आज १ जानेवारी रोजी चांदीचा दर ८७,२७० रुपये प्रति किलो आहे आणि १० ग्रॅमसाठी त्याची किंमत ८७३ रुपये आहे.

हेही वाचा – Gold Silver Price Today : वर्षाच्या शेवटी सोन्या- चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या मुंबई, पुण्यासह या शहारांतील आजचा २४ कॅरेट सोन्याचा दर

१ जानेवारी रोजी MCX फ्युचर्स (MCX Futures on January 1)

FEने दिलेल्या माहितीनुसार, ०५ फेब्रुवारी २०२५ रोजी संपणाऱ्या सोन्याच्या MCX फ्युचर्स कॉन्ट्रॅक्टची किंमत ७६,२६६ रुपये प्रति १० ग्रॅम आहे. MCX फ्युचर्सवर मार्च २०२५ च्या एक्सपायरीसह चांदीचे फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट्स ८७,५७५ रुपये प्रति किलोवर ट्रेडिंग करत होते.

.

Story img Loader