देशाच्या अर्थव्यवस्थेनंतर आता सर्वसामान्यांच्या आर्थिक स्थितीवरही अहवाल आणि अंदाज येऊ लागले आहेत. विशेषत: भारत सध्या जगातील सर्व वित्तीय संस्थांचा केंद्रबिंदू बनला आहे. जगातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक असलेल्या स्टँडर्ड चार्टर्डने देशाच्या दरडोई उत्पन्नावर वर्तवलेल्या अंदाजांमुळे देशातील जनता खूश होण्याची शक्यता आहे. २०३० पर्यंत भारताचे दरडोई उत्पन्न ७० टक्क्यांनी वाढू शकते, असा अंदाज बँकेने व्यक्त केला आहे. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला गती मिळण्याची अपेक्षा आहे. दुसरीकडे राज्यांच्या दरडोई उत्पन्नातही वाढ दिसून येत आहे. स्टँडर्ड चार्टर्ड बँकेने आपल्या अहवालात नेमके काय म्हटले आहे ते जाणून घेऊयात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरडोई उत्पन्न वाढण्याची कारणे कोणती?

भारताचे दरडोई उत्पन्न २०३० पर्यंत जवळपास ७० टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे आणि सध्याच्या २,४५० डॉलरच्या पातळीवरून ४,००० डॉलरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे, असंही बँकेच्या एका संशोधन अहवालात म्हटले आहे. उत्पन्नातील वाढीमुळे देशाला ६ ट्रिलियन डॉलरच्या GDP सह मध्यम उत्पन्न असलेली अर्थव्यवस्था बनण्यास मदत होणार आहे आणि यातील अर्धा हिस्सा देशांतर्गत वापरातून येणार आहे. २००१ नंतर दरडोई GDP २०११ मध्ये ४६० डॉलरने वाढून १,४१३ डॉलरवर गेला आहे आणि २०२१ मध्ये २,१५० डॉलरपर्यंत वाढला आहे. आर्थिक वाढीला चालना देणारा प्राथमिक घटक बाह्य व्यापार असेल, जो २०३० पर्यंत जवळजवळ दुप्पट २.१ ट्रिलियन डॉलरपर्यंत जाण्याची अपेक्षा आहे. आर्थिक वर्ष २०२३ मध्ये नोंदवलेल्या १.२ ट्रिलियन डॉलरच्या तुलनेत ही वाढ लक्षणीय होणार आहे, जेव्हा GDP ३.५ ट्रिलियन डॉलर आहे. अहवालात वार्षिक नाममात्र जीडीपी १० टक्के वाढीचा अंदाज आहे.

हेही वाचा- Money Mantra : आयटीआर फाइल करण्याची आज शेवटची तारीख; तात्काळ दाखल करा अन्यथा ५ हजार…

घरगुती वापर वाढणार

अहवालानुसार, या वाढीसाठी दुसरे प्रमुख योगदान हा देशांतर्गत वापर असेल, जो आर्थिक वर्ष २०३० पर्यंत ३.४ ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. हा आकडा सध्याच्या जीडीपीच्या आकाराएवढा असेल. याउलट आर्थिक वर्ष २०२३ मध्ये देशांतर्गत वापर २.१ ट्रिलियन डॉलर होता, त्या वेळी जीडीपीच्या सुमारे ५७ टक्के होता. खरं तर येत्या काळात भारतीय अर्थव्यवस्था टॉप ३ मध्ये येईल आणि ती ५ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचेल, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच सांगितले होते. जपान ही सध्या अमेरिका आणि चीननंतर जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था आहे.

हेही वाचा- Money Mantra : LIC ने आणली नवी जीवन किरण पॉलिसी, विम्यासह मिळणार मोठा फायदा

राज्यांच्या दरडोई उत्पन्नाचा अंदाज

तेलंगणा सध्या २,७५,४४३ रुपये (३,३६० डॉलरच्या समतुल्य) दरडोई उत्पन्नाच्या क्रमवारीत अव्वल आहे. यानंतर कर्नाटकात २,६५,६२३ रुपये, तामिळनाडूमध्ये २,४१,१३१ रुपये, केरळमध्ये २,३०,६०१ रुपये आणि आंध्र प्रदेशमध्ये २,०७,७७१ रुपये आहेत. दुसरीकडे स्टँडर्ड चार्टर्डचा विश्वास आहे की, २०३० पर्यंत यामध्ये बदल दिसून येईल. दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत गुजराज अव्वल स्थानी पोहोचू शकते. यानंतर महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, हरियाणा, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यांचा नंबर असेल. सध्या राष्ट्रीय GDP मध्ये तेलंगणा, दिल्ली, कर्नाटक, हरियाणा, गुजरात आणि आंध्र प्रदेश यांचे एकत्रित योगदान २० टक्के आहे. आर्थिक वर्ष २०३० पर्यंत या राज्यांनी ६,००० डॉलरचा दरडोई GDP गाठणे अपेक्षित आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In 2030 the per capita income of the country will go up to 4 thousand dollars the gdp is estimated to increase directly to 6 trillion dollars vrd