पीटीआय, नवी दिल्ली : देशात या ना त्या कारणाने रखडलेल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या संख्येत आणि त्यामुळे खर्चातही वाढ झाली आहे. सरलेल्या सप्टेंबर महिनाअखेरीस प्रत्येकी १५० कोटी रुपये अथवा त्यापेक्षा जास्त गुंतवणुकीच्या ४१७ पायाभूत प्रकल्पांच्या पूर्ततेतील दिरंगाईमुळे, खर्चात तब्बल ४ लाख ७७ हजार कोटी रुपयांची वाढ झाल्याचे अधिकृत आकडेवारी सांगते.

केंद्रीय सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी विभागाने जाहीर केलेल्या अहवालानुसार, १५० कोटी रुपये अथवा त्यापेक्षा अधिक रकमेच्या देशात एकंदर १,७६३ पायाभूत सुविधा प्रकल्पांचे काम सध्या सुरू आहे. सप्टेंबर महिन्यात त्यातील नियोजित वेळापत्रक उलटून रखडलेल्या ४१७ प्रकल्पांचा खर्च मूळ अंदाजित रकमेच्या तुलनेत ४ लाख ७७ हजार ९४२ कोटी रुपयांनी वाढला आहे.

mmrda acquire farmers lands in 124 villages of uran panvel and pen for third mumbai
भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांची एकजूट; उरण, पनवेलमधील १२४ गावे संपादित करण्याची अधिसूचना
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
process of regularizing project affected constructions gained momentum after return of mahayuti government
गरजेपोटी बांधकामांच्या नियमितीकरण प्रक्रियेला वेग; तांत्रिक मूल्यमापनाचे काम अंतिम टप्प्यात
land acquisition for ring road
रिंग रोडसाठी २०० हेक्टर भूसंपादन बाकी; ५०० कोटींच्या निधीची रस्ते विकास महामंडळाकडे मागणी
Panvel Virar House expensive , House expensive Panvel,
पाच वर्षात पनवेल, विरारची घरे महागली; दोन्ही ठिकाणच्या किमतीत ५८ टक्क्यांनी वाढ
Thane Water pipe connection, Thane arrears Water connection, Thane Water, Thane latest news, Thane marathi news,
ठाण्यात थकाबाकीदारांच्या १७८० नळजोडण्या खंडीत, ठाणे महापालिकेची कारवाई
Lakshmi Road will be closed again within three months after Ganeshotsav
गणेशोत्सवानंतर तीन महिन्यातच ‘लक्ष्मी रस्ता’ पुन्हा राहणार बंद, काय आहे कारण?
29 villages Vasai Virar, Vasai Virar Municipal Corporation, Vasai Virar,
२९ गावांचा वसई विरार महापालिकेत समावेश, ३१ हजार हरकतींवर जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी

हेही वाचा : Gold-Silver Price on 14 November 2023: सणासुदीत सोनं महागलं, १० ग्रॅमचा दर पाहून फुटेल घाम

या १,७६३ प्रकल्पांचा खर्च सुरुवातीला २४ लाख ८६ हजार ४०२ कोटी रुपये होता. हा खर्च सप्टेंबरअखेर २९ लाख ६४ हजार ३४५ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे या प्रकल्पांच्या खर्चात ४ लाख ७७ हजार ९४२ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. ही वाढ प्रकल्पाच्या मूळ अंदाजित खर्चापेक्षा सरासरी १९.२२ टक्के अधिक आहे. या प्रकल्पांसाठी सप्टेंबरअखेरपर्यंत एकूण १५ लाख ४४ हजार ६०० कोटी रुपये खर्च झाले असून, ते एकूण खर्चाच्या ५२.११ टक्के आहेत, असे अहवालाने नमूद केले आहे.

हेही वाचा : टाटा स्टील करणार नोकरकपात, ८०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार

विलंब झालेले ८४२ प्रकल्प

एकूण ८४२ प्रकल्पांना विलंब झाला आहे. परंतु, प्रकल्प पूर्ण होण्याची सध्याची सुधारीत अंतिम मुदत विचारात घेतल्यास एकूण ६१७ प्रकल्पांना विलंब झालेला आहे. याचवेळी २९८ प्रकल्प कधी पूर्ण होणार याचा निश्चित कालावधी जाहीर करण्यात आलेला नाही. तब्बल १२३ प्रकल्पांना ६० महिन्यांहून अधिक काळाचा विलंब झालेला आहे. सरासरी प्रत्येक प्रकल्पाला ३६.९४ महिनांचा विलंब झाला आहे, असे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

Story img Loader