Mumbai Real Estate Deal: देशाची आर्थिक राजधानी मुंबईतून अनेकदा मोठ्या मालमत्ता कराराच्या बातम्या येत असतात. मुंबईच्या रिअल इस्टेट मार्केटमध्ये १०० कोटी रुपयांच्या मोठ्या मालमत्तेचा सौदा झाल्याची माहिती मिळाली आहे. IndexTap.com ने दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा रियल्टीचे संचालक परेश पारेख आणि विजय पारेख यांनी मुंबईतील वरळी भागात १०० कोटी रुपयांचे दोन फ्लॅट खरेदी केले आहेत.
जाणून घ्या काय आहे ‘या’ फ्लॅट्सची खासियत
मनी कंट्रोलनं दिलेल्या वृत्तानुसार, या कराराची कागदपत्रे IndexTap.com कडे आहेत. त्यानुसार हे दोन्ही फ्लॅट सुरक्षा रियल्टीने श्रीनामन रेसिडेन्सीमध्ये खरेदी केले आहेत. ही दोन्ही अपार्टमेंट २६व्या आणि २७व्या मजल्यावर आहेत. या दोन्ही फ्लॅटचे एकूण क्षेत्रफळ सुमारे ६,४५८ चौरस फूट आहे. एकूण चार गाड्यांसाठी पार्किंग एरियादेखील आहे. या दोन्ही फ्लॅटमध्ये ६४० स्क्वेअर फूटची बाल्कनी आहे. मुंबईचा वरळी परिसर हा शहरातील उच्चभ्रू भागांपैकी एक आहे, जिथे सी-व्ह्यूबरोबरच शाहिद कपूर, अभिषेक बच्चन आणि अक्षय कुमार यांसारख्या अनेक दिग्गज चित्रपट कलाकारांची घरे आहेत.
हेही वाचाः RBI ने Axis Bank वर केली मोठी कारवाई अन् ठोठावला ९० लाखांचा दंड, नेमकं कारण काय?
इतके मुद्रांक शुल्क (स्टॅम्प ड्युटी) भरले
सुरक्षा रियल्टीने या दोन आलिशान फ्लॅटसाठी ५०-५० कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरले आहे. याशिवाय ३-३ कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरण्यात आले आहे. हा करार ७ नोव्हेंबर २०२३ रोजी झाला होता.
हेही वाचाः IMPS मधील तांत्रिक बिघाडानंतरही UCO बँकेने ६४९ कोटी रुपये केले वसूल, १७१ कोटी अजूनही अडकलेत
रेखा झुनझुनवाला यांच्या कंपनीने ७४० कोटी रुपयांचा मालमत्ता करार केला
खरं तर गेल्या काही दिवसांपूर्वीच दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्या कंपनी Kinnteisto LLP ने मुंबईतील बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स आणि चांदिवली परिसरात दोन व्यावसायिक मालमत्तांसाठी करार केला आहे. ही दोन्ही कार्यालये एकूण ७४० कोटी रुपयांना खरेदी करण्यात आली आहेत. ही कार्यालय क्षेत्र एकूण १.९४ लाख चौरस फुटांमध्ये पसरलेली आहेत.
‘या’ शहरांमध्ये आलिशान फ्लॅट्सची मोठ्या प्रमाणात विक्री
रिअल इस्टेट सल्लागार कंपनी CBRE साऊथ एशियाने आपल्या अहवालात सांगितले आहे की, २०२३ मध्ये लक्झरी घरांच्या मागणीत जोरदार वाढ झाली आहे. जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत ४ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या फ्लॅटच्या विक्रीत ९७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. जानेवारी-सप्टेंबर २०२३ दरम्यान लक्झरी श्रेणीतील ९२४६ घरे विकली गेली आहेत. गेल्या वर्षी या कालावधीत एकूण ४६८९ घरांची विक्री झाली होती. आलिशान घरांच्या विक्रीच्या बाबतीत दिल्ली-एनसीआर पहिल्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर मुंबई आणि तिसऱ्या क्रमांकावर हैदराबादचे नाव आहे.