वृत्तसंस्था, नवी दिल्ली : सणासुदीच्या काळात देशभरात क्रे़डिट कार्डद्वारे होणाऱ्या उसनवारीच्या व्यवहारांनी उच्चांकी पातळी गाठल्याचे आणि सरलेल्या ऑक्टोबर महिन्यात त्याद्वारे तब्बल १ लाख ७८ हजार कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचे अधिकृत आकडेवारीतून दिसले आहे. विक्रेत्याच्या ठिकाणी प्रत्यक्ष पॉइंट ऑफ सेल (पॉस) व्यवहार आणि ई-कॉमर्सच्या माध्यमातून ऑनलाइन अशा दोन्ही व्यवहारांसाठी कार्डाचा वापर वाढल्याचे स्पष्ट होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सप्टेंबर २०२३ मध्ये क्रेडिट कार्डद्वारे एक लाख ४२ हजार कोटी रुपयांचे व्यवहार झाले होते, मात्र ऑक्टोबर महिना हा सणासुदीचा काळ असल्याने या व्यवहारांत मोठी वाढ होऊन ते एक लाख ७८ हजार कोटी रुपयांवर पोहोचले. त्यात प्रत्यक्ष विक्रेत्याकडील ‘पॉस’ यंत्रावरील कार्ड व्यवहार ५७,७७४ कोटी रुपयांचे आहेत, तर ऑनलाइन व्यवहार तब्बल एक लाख २० हजार ७९४ कोटी रुपयांचे आहेत.

हेही वाचा : Gold-Silver Price on 25 November 2023: सोने महागलं की ग्राहकांना दिलासा? महाराष्ट्रातील ‘या’ शहरातील दर पाहा 

या उद्योगातील आघाडीची कंपनी एचडीएफसी क्रेडिट कार्ड्सचे व्यवहार सप्टेंबरमध्ये ३८,६६१ कोटी रुपये होते. ते ऑक्टोबरमध्ये ४५,१७३ कोटी रुपयांवर पोहोचले. याचप्रमाणे ऑक्टोबरमध्ये इतर क्रेडिट कार्ड कंपन्यांचे व्यवहार वाढले. त्यात आयसीआयसीआय बँकेचे व्यवहार ३४,१५८ कोटी रुपये, ॲक्सिस बँक २१,७२८ कोटी रुपये, एसबीआय कार्ड्स ३५,४०६ कोटी रुपये या व्यवहारांचा समावेश आहे.

हेही वाचा : आरबीआयने BOB, IOB आणि सिटी बँक यांना ठोठावला कोट्यवधींचा दंड; PNB अन् AXIS वरसुद्धा कारवाई, ग्राहकांवर काय परिणाम?

एचडीएफसी बँकेचे सर्वाधिक कार्डधारक

एचडीएफसी बँकेचे सर्वाधिक १.९१ कोटी क्रेडिट कार्डधारक ग्राहक आहेत. त्याखालोखाल एसबीआय कार्ड्स १.८० कोटी, आयसीआयसीआय बँक १.६० कोटी आणि ॲक्सिस बँक १.३० कोटी अशी कार्डधारकांची संख्या आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In india during festive season record credit card transactions of rupees 1 lakh 78 thousand in october month print eco news css
Show comments