वृत्तसंस्था, पीटीआय

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशातील आघाडीच्या माहिती तंत्रज्ञान कंपन्यांतील मनुष्यबळात दुसऱ्या तिमाहीमध्ये घट झाल्याचे समोर आले आहे. नवीन कार्यादेशात घट होत असल्याने कंपन्यांकडून नवीन कर्मचाऱ्यांची भरती कमी झाले आहे. त्याऐवजी उपलब्ध मनुष्यबळाचाच पुरेपूर वापर करून घेण्याचे पाऊल या कंपन्यांनी उचलले आहे. इतरही कंपन्यांमध्ये सध्या असाच प्रकार सुरू आहे.

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस), इन्फोसिस आणि एचसीएल टेक यांच्या एकत्रित मनुष्यबळात दुसऱ्या तिमाहीत १६ हजार १६२ एवढी घट झाली. त्यात टीसीएसच्या मनुष्यबळात ६ हजार ३३३ घट झाली असून, मागील पाच वर्षांतील ही सर्वांत मोठी घट आहे. इन्फोसिसच्या मनुष्यबळात ७ हजार ५३० ने घट झाली असून, एचसीएलचे मनुष्यबळ २ हजार २९९ ने कमी झाले आहे.

सर्वच कंपन्यांमध्ये मनुष्यबळ विभागप्रमुख हे उपलब्ध कर्मचाऱ्यांचा पुरेपूर वापर करण्यावर भर देत आहेत. या कंपन्यांनी नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्यांच्या जागा न भरण्याची भूमिका घेतली आहे. या कंपन्यांतून कर्मचारी नोकरी सोडून जाण्याचे प्रमाण मागील वर्षभरात १४ टक्के आहे. नोकरी जॉबस्पीक निर्देशांकानुसार, यंदा नऊ महिन्यांत माहित तंत्रज्ञान क्षेत्रातील नोकर भरतीत घट दिसून आली आहे. नवीन कार्यादेशात होणारी घट आणि अनिश्चित आर्थिक वातावरण यामुळे मागील काही तिमाहींमध्ये कर्मचारी नोकरी सोडून जाण्याचे प्रमाणही घटले आहे.

आघाडीच्या तीन कंपन्यांची आकडेवारी

कंपनीमनुष्यबळ घटगळती दर
टीसीएस६,३३३१४.९ %
इन्फोसिस७,५३०१४.६ %
एचसीएल टेक२,२९९१४.६ %

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In leading it companies country manpower reduction takes place in last few months print eco news asj
Show comments